ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे ९६व्या वर्षी निधन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे मालवली प्राणज्योत

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे ९६व्या वर्षी निधन

ब्रिटनच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचे बालमोराल येथे वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले. तब्बल ७० वर्षे त्यांनी ब्रिटनच्या राणी म्हणून सूत्रे सांभाळली.

गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी राजघराण्यातील सर्व स्कॉटलंडला जमले होते. राणी एलिझाबेथ यांनी १९५२मध्ये राज्यकारभार हाती घेतला. त्यांच्या या कारकीर्दीत अनेक सामाजिक बदल झाले. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचे सुपुत्र प्रिन्स चार्ल्स हे देशाची सूत्रे राजा या नात्याने हाती घेतील.

राजे चार्ल्स यांनी यासंदर्भात आपले निवेदन सादर केले असून त्यात ते म्हणतात की, माझ्या प्रिय आईच्या मृत्यूमुळे मला आणि आमच्या सर्व कुटुंबियांना अतिव दुःख झाले आहे. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्युमुळे देशाचे नुकसान झाले आहे.

राजे चार्ल्स आणि त्यांची पत्नी हे आता बकिंगहॅम राजवाड्यातच राहतील आणि शुक्रवारी ते तिथून रवाना होतील. राणी एलिझाबेथ यांची सर्व मुले बालमोराल येथे येणार आहेत. राणी एलिझाबेथ यांचा नातू प्रिन्स विल्यमही त्यावेळी उपस्थित होता. त्याच्यासोबत राजपुत्र हॅरीदेखील उपस्थित होता.

हे ही वाचा:

याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!

‘बॉलीवूडच्या सिनेमातून भारतीयत्व हरवले आहे’

आज आधुनिक भारताची प्राणप्रतिष्ठापना झाली

 

राणी एलिझाबेथ यांच्या कारकीर्दीत १५ पंतप्रधान झाले. विन्स्टन चर्चिल हे त्यातील एक. १८७४मध्ये चर्चिल यांचा जन्म झाला होता आणि त्यानंतर विद्यमान पंतप्रधान लिझ यांच्या कार्यकाळातही राणी एलिझाबेथ होत्या. या ट्रस यांचा जन्म चर्चिल यांच्या जन्माच्या १०१ वर्षांनी झालेला आहे. एवढ्या सगळ्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत राणी एलिझाबेथ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंतप्रधानांशी दर आठवड्याला त्या संवाद साधत.

राणी एलिझाबेथ यांची प्रकृती बिघडल्याचे कळल्यानंतर बकिंगहॅम पॅलेस येथे लोकांनी जमण्यास सुरुवात केली. नंतर त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकल्यानंतर लोकांना रडू आवरले नाही. राजवाड्याच्या वर फडकत असलेला युनियन जॅक अर्धा खाली उतरविण्यात आला.

Exit mobile version