क्वाड पार्टनरशिप २०२२ पर्यंत भारतात किमान एक अब्ज लसींचे डोस तयार करण्याच्या मार्गावर आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी सांगितले. कोविड -१९ ला पराभूत करण्यासाठी एकत्र काम करण्यापेक्षा अधिक महत्वाचे काहीही नाही. असंही ते म्हणाले.
“अमेरिका आणि त्याचे आंतरराष्ट्रीय सहकारी देश जगभरातील इतर देशांमध्ये लसीचे उत्पादन वाढवण्यासाठी वेगाने काम करत आहेत जेणेकरून ते देखील उत्पादन करू शकतील.” असे बायडन यांनी कोविड -१९ समाप्त करण्यासाठी जागतिक परिषदेला दिलेल्या भाषणात सांगितले.
बायडन म्हणाले, “आम्ही, सहकारी देश, औषध कंपन्या आणि इतर उत्पादकांसोबत इतर देशांमधील सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी लस तयार करण्याची त्यांची स्वतःची क्षमता वाढवण्यासाठी काम करत आहोत.”
“उदाहरणार्थ, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत आमची क्वाड भागीदारी २०२२ च्या अखेरीपर्यंत जागतिक पुरवठा वाढवण्यासाठी भारतात किमान १ अब्ज लसी तयार करण्यात मदत करण्याच्या मार्गावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि पुढील वर्षी आफ्रिकेसाठी आफ्रिकेत जॉनसन अँड जॉन्सन ५०० दशलक्षाहून अधिक डोस तयार करणार आहे.” असंही ते म्हणाले.
हे ही वाचा:
मोदींच्या अमेरिका भेटीतून मिळणार सशस्त्र ड्रोन?
‘ही’ असेल भारताची पहिली इलेक्ट्रिक सुपरकार
किरीट सोमय्या यांचे मूल्य ५५० कोटी रुपये
बिजिंगपर्यंत मारा करणाऱ्या अग्नी-५ ची आज चाचणी
“कोविड -१९ ला पराभूत करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करण्यापेक्षा अधिक महत्वाचे काहीही नाही. भविष्यातील महामारीसाठी जग अधिक चांगले तयार होणार आहे.” असे सांगून बायडन म्हणाले की, “अमेरिका हे लसींचे शस्त्रागार बनेल हे वचन पाळत आहे. जसे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लोकशाहीसाठी ते शस्त्रागार होते.”