पुतीन यांचे गुरू म्हणतात, भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा, संस्कृतीत जगाला नवी दिशा देण्याची क्षमता

अलेक्झांडर डुगिन हे अखंड भारताच्या कल्पनेने प्रभावित

पुतीन यांचे गुरू म्हणतात, भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा, संस्कृतीत जगाला नवी दिशा देण्याची क्षमता

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे गुरू आणि रशियन राजकीय विचारवंत, तत्त्वज्ञ अलेक्झांडर डुगिन यांनी भारताबाबत त्यांचे विचार मांडले आहेत. अलेक्झांडर डुगिन हे अखंड भारताच्या कल्पनेने प्रभावित असून त्यांनी भारताला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती म्हणून पाहिले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताच्या वाढत्या प्रभावी भूमिकेचे आणि प्राचीन परंपरा पुनरुज्जीवित करण्याच्या प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले आहे.

अलेक्झांडर डुगिन यांनी म्हटले आहे की, संयुक्त भारत हा केवळ भौगोलिक विस्तार नसून तो एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहे. भारताच्या प्राचीन वैदिक परंपरा आणि तिची खोल सांस्कृतिक यांच्यामध्ये जगाला नवी दिशा देण्याची क्षमता असल्याचे मत डुगिन यांनी मांडले आहे.

भारताने आपल्या महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करणे आवश्यक आहे. कारण, वैदिक सभ्यतेची संकल्पना सर्वसमावेशक असून तिच्या पुनर्स्थापनेने बहुध्रुवीय विश्वाच्या स्थापनेला मदत मिळेल, असे डुगिन यांनी म्हटले आहे. ते रशियातील सरकारी मीडिया रशिया टीव्हीसोबत (आरटी) बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना डुगिन म्हणाले की, त्यांनी भारतातील प्राचीन वैदिक परंपरांना आधुनिकतेशी जोडण्याचे काम केले आहे. डुगिन यांच्या म्हणण्यानुसार, नरेंद्र मोदींच्या प्रयत्नांमुळे भारत एक शक्ती म्हणून उदयास आला आहे. जो आपला सांस्कृतिक वारसा जपत जागतिक पटलावर आपला ठसा उमटवत आहे.

हे ही वाचा..

काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करेल, हे मान्य नाही

मुरादाबादमध्ये मिडीया जिहाद? सक्रीय पत्रकारांची यादी जाहीर

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

युवराज म्हणतात, अदानींना अटक करा!

या वर्षाच्या एप्रिल महिन्यात अलेक्झॅन्डर डुगिन यांनी अखंड भारतासंदर्भात आपले विचार मांडले होते. त्यांनी आपल्या लेखात भारताच्या उदयासंदर्भात रशिया काय विचार करतो हे लिहिले होते. तसेच, भारत आपल्या डोळ्यांसमोर एक नवीन जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे, असेही डुगिन यांनी म्हटले होते. याशिवाय, त्यांनी आपल्या लेखातून भारतीय अर्थव्यवस्थेच्या तेजीसंदर्भातही आनंद व्यक्त केला.

Exit mobile version