पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावरून २०२५ मध्ये पुतीन करणार भारत दौरा!

रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीन यांचा पहिलाच भारत दौरा असणार आहे

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावरून २०२५ मध्ये पुतीन करणार भारत दौरा!

भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे अत्यंत चांगले संबंध असून याची प्रचीती वारंवार आले आहे. हल्लीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोडी हे रशिया दौऱ्यावर जाऊन आले. यानंतर आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारत भेटीचे आमंत्रण देण्यात आले आहे. २०२५ साली पुतीन यांचा हा भारत दौरा असण्याची शक्यता आहे.

पुतीन यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा २०२५ च्या सुरुवातीला निश्चित केल्या जातील, अशी माहिती क्रेमलिनचे सहकारी युरी उशाकोव्ह यांनी दिली आहे. ते म्हणाले की, आम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आमंत्रण मिळाले आहे. आम्ही त्याचा नक्कीच सकारात्मक विचार करू. पुढील वर्षीच्या सुरुवातीला आम्ही तात्पुरत्या तारखा ठरवू, असेही उशाकोव्ह यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०२२ मध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतीन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे. त्यामुळे या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये कोणती चर्चा होणार याकडे लक्ष असणार आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी यांनी यापूर्वी ६ डिसेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २१ व्या भारत- रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारत दौरा केला होता.

हे ही वाचा..

मालेगाव व्होट जिहाद घोटाळा: २१ बँक खात्यांमधून ८०० कोटींचे व्यवहार

पंतप्रधान मोदी ‘द साबरमती रिपोर्ट’ सिनेमा पाहणार; संसदेत विशेष स्क्रीनिंग

टू स्पेसक्राफ्ट मिशनसाठी युरोपियन स्पेस एजन्सीसोबत इस्रो सज्ज

योगी सरकारचा मोठा निर्णय; महाकुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑक्टोबर महिन्यात रशिया दौऱ्यावर गेले होते. पंतप्रधान मोदी रशियन फेडरेशनच्या अध्यक्षतेखाली कझान येथे झालेल्या १६ व्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी रशियाला गेले. पंतप्रधान मोदींनी या वर्षी जुलैमध्येही मॉस्कोला भेट दिली होती. २२ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली होती.

Exit mobile version