युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेले युद्ध शमण्याचे चिन्ह दिसत नसताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे.

युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांची स्वाक्षरी

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये सुरू असलेले युद्ध शमण्याचे चिन्ह दिसत नसताना आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. युक्रेनचे चार प्रांत विलीन करण्याच्या करारावर पुतीन यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

रशियाने युद्ध करून ताब्यात घेतलेल्या लुहान्स्क, डोनेस्क, खेरसन आणि झापोरीझिया या युक्रेनच्या प्रांतांमध्ये नागरिकांचे मत घेण्यात आले होते. या रशियापुरस्कृत सार्वमतामध्ये नागरिकांनी रशियात समावेशाचा कौल दिल्याचा निकाल रशियाधार्जिण्या अधिकाऱ्यांनी जाहीर केला. या निकालानंतर तीनच दिवसांनी पुतीन यांनी हे प्रांत रशियात समाविष्ट करत असल्याचा करार या प्रांतांच्या अधिकाऱ्यांसोबत केला. क्रेमलिन प्रासादातील जॉर्ज सभागृहात हा मोठा सोहळा पार पडला.

या करारानंतर युक्रेनसह पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्यावर टीका केली आहे. “युक्रेनचे भवितव्य हे युद्धभूमीतच निश्चित होईल. रशियाने बळकावलेला भाग परत घेण्याची आमची मोहीम सुरूच राहील,” असं मत युक्रेन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रमुख अँड्री येर्माक यांनी व्यक्त केले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसचा अध्यक्ष, अध्यक्ष खेळ सुरूच

गुजरातमध्ये सापडला खोट्या नोटांचा साठा

देशात शांतता संविधानामुळे नव्हे, तर हिंदूंमुळे

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याआधी उधमपूर बॉम्बस्फोटाने हादरले

अमेरिका आणि युरोपीय महासंघाने याबाबत संतप्त प्रतिक्रिया दिली असून आंतरराष्ट्रीय कायदा धाब्यावर बसवून केलेले हे अनधिकृत विलीनीकरण मान्य करणार नाही, अशी भूमिका पाश्चिमात्य देशांनी घेतली आहे. युरोपीय महासंघाच्या सदस्यांनी संयुक्त पत्रकाद्वारे रशियाने केलेले विलीनीकरण नाकारत असल्याचे सांगत रशियाच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

Exit mobile version