रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारतात झालेल्या जी- २० परिषदेला अनुपस्थित होते. दरम्यान, पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. नरेंद्र मोदींच्या धोरणांचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले आहे. ‘मेक इन इंडिया’ धोरणाची त्यांनी एका मुलाखतीत विशेष प्रशंसा केली आहे. रशियाच्या व्लादिवोस्तोक या शहरामध्ये ८ व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (EEF) मध्ये बोलतांना पुतीन यांनी भारताचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीयांना मेक इन इंडिया वस्तूंच्या वापरासाठी प्रोत्साहन देऊन योग्य करत आहेत. रशियन-निर्मित मोटारींबाबत केलेल्या प्रश्नावर बोलताना पुतिन म्हणाले की, “देशांतर्गत उत्पादित मोटारगाड्यांचा वापर केला पाहिजे आणि भारतासारख्या देशांनी मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या धोरणांद्वारे याची उत्तम उदाहरणे समोर ठेवली आहेत.”
पुतिन म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे, १९९० च्या दशकात आपण देशांतर्गत गाड्या बनवल्या नव्हत्या, पण आता त्याची सुरुवात केलेली आहे. आपण आपल्या मित्र देशांकडून विशेषतः भारतासारख्या आपल्या मित्र देशाकडून शिकले पाहिजे. सध्या भारत मुख्यतः देशातच उत्पादित केलेल्या गाड्या आणि जहाजांच्या उत्पादनावर, वापरावर लक्ष केंद्रित करत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना मेड इन इंडिया ब्रँड वापरण्यासाठी प्रोत्साहित करून योग्य काम करत आहेत. आमच्याकडे ती वाहनेही उपलब्ध आहेत आणि आम्ही त्यांचा वापर केला पाहिजे,” असं पुतीन म्हणाले.
#WATCH | On driving Russian-made cars, Russian President Vladimir Putin says, "…I guess in this regard, we should learn from many partners of ours, namely our partners in India. They are mostly focusing on production and use of the cars and vessels produced in India. And in… pic.twitter.com/Mloawwm20M
— ANI (@ANI) September 13, 2023
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे हे केवळ मनोरंजन करणारे ‘विदूषक’ !
भारत, मध्य पूर्व आणि युरोपियन कनेक्टिव्हिटी कॉरिडॉरमधून चीनला तडाखा
शेवटी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन झाले भारतातून जस्ट आऊट
पुतिन म्हणाले की, “नवी दिल्लीत जी- २० नेत्यांच्या शिखर परिषदेच्या वेळी घोषित करण्यात आलेल्या भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर (आयएमईसी) मध्ये रशियाला अडथळा आणू शकेल असे काहीही नव्हते आणि त्या प्रकल्पाचा फायदा आहे.”