पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

पुतीन यांनी भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचे केले कौतुक

पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. त्यांनी भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. भारताची अर्थव्यवस्था सध्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने वाढत आहे, असं पुतीन म्हणाले आहेत.

वालदाई डिस्कशन क्लबला संबोधित करताना पुतीन यांनी भारताच्या उत्कृष्ट आर्थिक विकास दराची प्रशंसा केली आणि रशिया आणि भारत यांच्यातील संबंध ऐतिहासिक असल्याचे सांगितले. भारताची अर्थव्यवस्था सध्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने वाढत असल्याने जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र आहे, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. रशिया भारतासोबत सर्व दिशांनी संबंध विकसित करत आहे आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणात विश्वास आहे.

“आम्ही भारतासोबत सर्व दिशांनी संबंध विकसित करत आहोत. भारत हा एक महान देश आहे, आता लोकसंख्येच्या बाबतीतही सर्वात मोठा देश आहे. आमचे संबंध कोठे आणि कोणत्या वेगाने विकसित होतील याची आमची दृष्टी आजच्या वास्तविकतेवर आधारित आहे. आमच्या सहकार्याचे प्रमाण दरवर्षी अनेक पटींनी वाढत आहे,” असे पुतीन यांनी म्हटले आहे. सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातही भारत आणि रशिया यांच्यातील संपर्क विकसित होत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. ते म्हणाले की, किती प्रकारची रशियन लष्करी उपकरणे भारतीय सशस्त्र दलांच्या सेवेत आहेत ते पहा. या नात्यात खूप विश्वास आहे. आम्ही आमची शस्त्रे भारताला विकत नाही; आम्ही त्यांची संयुक्तपणे रचना करतो, असे पुतीन यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : 

मविआचे लोक शिव्या देण्यावर उतरलेत, महिलांनो सतर्क राहा

मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक तरीही चालकाच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे सुरू

तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड

भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जगावर उपकार केले नाहीतर…

दरम्यान, जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला गेले होते. यावेळी नरेंद्र मोदींनी रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेचे आवाहन केले होते. याशिवाय ब्रिक्स परिषदेदरम्यान पुतीन म्हणाले होते की, आमच्या संबंधांना अनुवादकाची गरज नाही.

Exit mobile version