पुण्यातील फार्मा कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला

पुण्यातील फार्मा कंपनीने कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरला

पुण्यातील एका मोठ्या औषध कंपनीवर कोरोना विषाणू लसीचा फॉर्म्युला चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. अमेरिकेच्या एचडीटी बायो नावाच्या कंपनीने पुण्यातील एमक्योर फार्मास्युटिकल्स कंपनीवर हा आरोप केला आहे. कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरून स्वतःची लस बनवल्याचा आरोपांबाबत, एमक्युअर फार्मा कंपनीवर वॉशिंग्टनच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला आहे. या अमेरिकन कंपनीने एमक्युअर फार्मा विरोधात ७ हजार २०० कोटी रुपयांचा दावा ठोकला आहे.अमेरिकन कंपनीच्या या कारवाईमुळे भारतातील फार्मा इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.

एचडीटी बायो कंपनीने असा दावा की, पुणेस्थित कंपनीने आमचा कोरोना लसीचा फॉर्म्युला चोरून आमच्या फॉर्म्युल्यापासून लस तयार केली आहे. एमक्युअर ने एचडीटी बायो कॉर्पचा फॉर्म्युला आणि तंत्रज्ञान वापरून लस विकसित केली. तसेच एमक्युअरने चोरीचे तंत्रज्ञान वापरून भारतात दोन पेटंटसाठी अर्ज केला आणि आपली ही ‘स्वदेशी विकसित’ लस सांगून IPO दाखल केला.

हे ही वाचा:

सुजित पाटकर व इतरांविरुद्ध सोमय्यांची एस्प्लनेड न्यायालयात याचिका

ठाणे महापालिका आयुक्त शिवबंधनात?

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातून होणार आणखी ‘फाइल’ उघड

लग्न करून धर्मांतराला नकार दिला म्हणून हिंदू तरुणीची हत्या

मात्र, एचडीटी बायो हे आरोप फेटाळून लावले आहेत. एचडीटी बायो कंपनीने २०२० मध्ये एमक्युअरची उपकंपनी असलेल्या जेनोव्हा बायो कंपनीसोबत एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून संयुक्तपणे कोविड लस विकसित करण्यासाठी करार केला होता. त्यामुळे हे जे खटल्याचे प्रकरण आहे ते जेनोव्हा बायो आणि अमेरिकन कंपनी एचडीटी यांच्यात आहे. या प्रकरणाशी एमक्युअर फार्माचा काहीही संबंध नाही. तसेच हा दावा रद्द करण्यासाठी एमक्युअर कंपनी आवश्यक कायदेशीर पावले उचलणार आहे, असे एमक्युअर कंपनीने सांगितले.

Exit mobile version