१४ फेब्रुवारी २०१९ ला देशवासियांना एका अप्रिय घटनेने धक्का दिला १४ फेब्रुवारीला जम्मू श्रीनगर महामार्गावरून जात असलेल्या सीआरपीएफ जणांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. जखमी जवानांना त्वरित जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र मोठ्या संख्येने जवानांचा जागीच मृत्यू झाला. तर काहींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी स्फोटकांनी भरलेल्या वाहनांना जम्मूहून श्रीनगरला जणाऱ्या बसला धडक दिल्याने सी आर पी एफ जवान शहिद झाले होते. भारतीय सुरक्षा दलांवरील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी हा एक होता.
Gave 42 plants to students in the name of 42 soldiers who were martyred in Pulwama attack. The memory of our martyred soldiers should always stay alive in the hearts of our younger generation. pic.twitter.com/kEOW8FugUN
— PM Narendra Modi ⚪️ (@ModiIndianFans) February 14, 2023
चार वर्षांपूर्वी या पुलवामा हल्ल्यात प्राण गमावलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अर्थात सीआरपीएफ जवान शहिद झाले त्यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, त्यांच्या धाडसाने मला ‘एक मजबूत आणि विकसित भारत घडवण्यासाठी’ प्रेरित केले, असे ट्विटर वर त्यांनी म्हण्टले आहे. भारतीय सुरक्षा दलांवरील सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी १४ फेब्रुवारी २०१९ रोजी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या बसला धडक दिल्याने ४० सी आर पी एफ जवान शाहिद झाले, दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा श्रद्धांजली अर्पण करताना देश, सैनिकांचे बलिदान कधीही विसरणार नाही.
हे ही वाचा:
WPL : भारतीय महिला खेळाडू स्मृती मानधनाला सर्वाधिक मानधन
ज्युलीने तुर्कीत ढिगाऱ्याखाली ६ वर्षांच्या बेरिनला पाहिले, रोमिओने खात्री केली आणि…
अजित पवार करतायत काय? किर्तन कि तमाशा?
लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत त्यांच्या शौर्य आणि अदम्य साहस नेहमीच प्रेरणादायी राहील असे सुद्धा शाह म्हणाले. पराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी २०१९ मध्ये ज्यांनी पुलवामा येथे आजच्याच दिवशी प्राणार्पण केले त्या आमच्या शूर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत आदरांजली वाहिली आहे.
आम्ही आमची जागरूकता राखून आणि सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचा मुकाबला करून श्रद्धांजली अर्पण करतो. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले , की, शाहिद झालेल्या शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी देशासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदान आणि समर्पणाचे स्मरण करतो त्यांचे शौर्य आणि देशासाठी निस्वार्थी सेवा प्रत्येक नागरिकांसाठी प्रेरणास्रोत आहे. आणि सदैव स्मरणात राहील. १४ फेब्रुवारीला २०१९ रोजी पुलवामा येथे जवानांवर दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या सर्व शूर जवानांना विनामरे श्रद्धांजली. त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचे राष्ट्र कायम ऋणी राहील.