बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर बांगलादेशात अराजक माजले आहे. त्याचा फटका तेथील अल्पसंख्य हिंदूंना, मंदिरांना मोठ्या प्रमाणावर बसतो आहे. त्यामुळे आता बांगलादेशातील हिंदूही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून या सगळ्या अन्यायाचा निषेध करत आहेत. भारतातही बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्रात सांगलीत हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुढील मुद्द्यांवर ही निषेध सभा घेतली जाणार आहे. ही निषेध सभा १३ ऑगस्टला होणार आहे.
१) बांगलादेशात हिंदू महिलावर आत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा निषेध.
२) हिंदू मंदिरावर हल्ले करून देवाची विटंबना करून तोडफोड निषेध.
३) भारत सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशी हिंदूना संरक्षण देण्यात यावे.
४)भारतात घुसखोरी केलेले बांगलादेशी लोकांना हुडकून तात्काळ बंगलादेशी परत पाठवा.
५) बांगलादेशांतील पीडित हिंदूना तात्काळ भारतात आश्रय द्यावा.
६) भारताने बांगलादेश मधील हिंसाचार प्रकणात हस्तक्षेप करावा.
बांगलादेशी हिंदू आपले धर्म बांधव असल्यामुळे प्रत्येक हिंदू चे धर्म कर्तव्य आहे त्यामुळे निषेध सभेला मोठया संख्येने हिंदूनी उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
अझीम प्रेमजी विद्यापीठही आता इस्रायलविरोधी प्रचाराचे मैदान
उपराष्ट्रपतींकडून काँग्रेस नेत्याला चपराक
‘घरोघरी तिरंगा अभियान’ आता लोकचळवळ
पश्चिम बंगालमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टर तरुणीची अत्याचार करून हत्या
निषेध सभा मंगळवार सायंकाळी ६:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, मारुती चौक,सांगली येथे सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्तेयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान हिंदू एकता आंदोलन प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हा अध्यक्ष संजय जाधव, शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष विष्णुपंत पाटील, दत्तात्रय भोकरे, सांगली शहराध्यक्ष प्रकाश चव्हाण, परशुराम चोरगे, सांगली शहर उपाध्यक्ष दर्शन शिखरे, मिरज शहराध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, खणभाग विभाग अध्यक्ष अवधूत जाधव, सांगलवाडी विभाग अध्यक्ष अनिरुद्ध कुंभार चिंतामण नगर विभाग अध्यक्ष विजय शेटके यांनी केले आहे.