बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ल्यांविरोधात ठाण्यात उठला आवाज

बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ल्यांविरोधात ठाण्यात उठला आवाज

बांगलादेशात झालेले हिंदुंवरील हल्ले, मंदिरांची झालेली तोडफोड याविरोधात भारतातही वातावरण तापू लागले आहे. अनेक स्तरावर बांगलादेशातील या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध केला जाऊ लागला आहे.

बांगलादेश सरकारने हिंदुंच्या या छळवणुकीविरोधात कारवाई करावी, अशी मागणी बांगलादेश सरकारकडे करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदेच्या तसेच बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यात बांगलादेशातील हिंदुंच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आणि बांगलादेशविरोधी घोषणाही देण्यात आल्या.

भारत सरकारकडेही त्यांनी अशी मागणी केली असून बांगलादेशातील हिंदुंच्या समस्येकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.

ठाण्यात यासंदर्भात झालेल्या आंदोलनात बांगलादेशातील घटनांबद्दल निषेध नोंदविण्यात आल. त्यावेळी या मागण्या करण्यात आल्या की, पीडित अल्पसंख्याक हिंदुंना न्याय मिळायला हवा आणि त्यांना सुरक्षितता मिळायला हवी.

 

हे ही वाचा:

कन्हैया कुमारच्या फोटोत असे काय आहे ज्यावरून नेटकंऱ्यानी केले ट्रोल?

अक्षय कुमार दिसणार नव्या अवतारात!

‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च

काय आहे भारताची ‘अभ्यास’ मिसाईल?

 

ज्यांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे त्यांना त्याची उचित भरपाई मिळायला हवी. ज्यांनी हिंदुंच्या मंदिरांवर, घरांवर हल्ले केले आणि त्याची मोडतोड केली, हत्या केल्या, अत्याचार केले त्यांना वेचून वेचून शोधण्यात यावे आणि त्यांना कठोर शिक्षा दी जावी.

अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून योग्य पावले उचलली जावीत. बांगलादेशातील हिंदुंच्या मानवाधिकारांचे रक्षण व्हावे आणि त्यांना शांतपणे जीवन जगण्याचा अधिकार मिळावा.

बांगलादेशात नवरात्रीच्या दरम्यान अनेक ठिकाणी हिंदुंच्या मंदिरांवर हल्ले करून मोडतोड करण्यात आली. दुर्गामातेच्या मंडपावर हल्ला करून मूर्ती, सजावट उद्ध्वस्त करण्यात आली.

Exit mobile version