५०० वर्षांपूर्वी धर्मगुरूने सांगितले होते, इंडोनेशियात पुन्हा हिंदूंचा प्रभाव येणार…

५०० वर्षांपूर्वी धर्मगुरूने सांगितले होते, इंडोनेशियात पुन्हा हिंदूंचा प्रभाव येणार…

आज इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम बहुसंख्याक असलेला देश आहे. एकेकाळी या राष्ट्रावर हिंदू धर्माचा मोठा प्रभाव होता. इस्लामच्या आगमनानंतर हिंदू धर्माचा प्रभाव कमी होऊन हिंदू अल्पसंख्यांक बनले.

सब्दापलोन हा इंडोनेशियातील सर्वात सामर्थ्यवान साम्राज्य असलेल्या मजपाहित साम्राज्याचा राजा ब्रविजय- ५ याच्या दरबारातील एक गूढ पुजारी होता. जेव्हा राज्य इस्लामिक प्रभावाखाली आले आणि १४७८ मध्ये ब्राविजय- ५ने इस्लाम स्वीकारला तेव्हा सब्दापलोनने राजाला शाप दिला होता. नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या वेळी ५०० वर्षांनंतर परत यावे लागेल, असे सांगितले होते.

सब्दापलोनने चेतावणी दिली होती, ‘आतापासून ५०० वर्षांनंतर मी परत येईन आणि जावाभोवती अध्यात्म पुनर्संचयित करीन. जे नकार देतील त्यांचा अंत होईल आणि ते राक्षसांसाठी अन्न बनतील.’ इंडोनेशियातील लोकांना त्याच्या परत येण्यावरून चेतावणी देताना, तो पुढे म्हणाला, ‘जेव्हा माऊंट मेरापीमध्ये उद्रेक होऊन त्याचा लावा आणि राख उग्र वासाने दक्षिण- पश्चिमेकडे पसरेल, तेव्हा मी लवकरच येणार आहे, याचा तो संकेत असेल.’ विशेष म्हणजे, १९७८ मध्ये, राष्ट्रामध्ये आधुनिक हिंदू मंदिरांचे बांधकाम पूर्ण झाले. अनेक मुस्लिमांनी हिंदू धर्मात पुनर्परिवर्तन केले आणि त्या वेळी सेमेरू पर्वतातही उद्रेक झाला होता. सब्दापलोनची ती भविष्यवाणी खरी आहे, असा हिंदूंचा विश्वास बसला.

हे ही वाचा:

सुदानमध्ये लष्करी उठाव?

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

जयभया हे ११३५ ते ११५७ केदिरी राज्याचे शासक होते आणि त्यांनी पूर्व जावामध्ये प्रचंड समृद्धी आणली होती. त्यांनी संघर्षाच्या काळात राज्यावर सामाजिक सुव्यवस्था राखली होती. आधुनिक इंडोनेशियामध्ये आजही त्याला सांस्कृतिक महत्त्व आहे. जयभया यांनी हिंदू साहित्याचे समर्थन केले होते. त्यांच्या कारकिर्दीत जावामधील लोकांचा असा विश्वास होता की, हिंदू शासक हा भगवान विष्णूचा पुनर्जन्म आहे. जयभयाने ‘भविष्यसूचक श्लोक’ लिहिले, जे ‘सेरत जयभया’ म्हणून ओळखले जातात. हे मौखिक माध्यमातून पिढ्यानपिढ्या पुढे गेले आणि त्याची सर्वात जुनी लिखित प्रत शेवटी १८३५ मध्ये अनुवादित झाली.

त्यांच्या प्रसिद्ध भविष्यवाण्यांपैकी एक म्हणजे गोऱ्या लोकांनी जावामध्ये वसाहतीकरण केले. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे ४०० वर्षांनंतर जावा १५९५ मध्ये डच लोकांनी ताब्यात घेतले होते. जयाभयाने असेही भाकीत केले होते की ‘पिवळ्या त्वचेचे पुरुष’ ‘पांढऱ्या त्वचेच्या पुरुषां’कडून द्वीपसमूहाचा ताबा घेतील. दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी लोकांनी इंडोनेशियावर आक्रमण केले आणि डचांची वसाहत संपवली तेव्हाही ते खरे ठरले होते. त्यावरूनच ते विष्णूचा पुनर्जन्म आहे, यावर लोकांचा विश्वास बसला होता.

इंडोनेशियात ९० टक्के मुस्लिम आहेत त्या देशाचे संस्थापक सुकार्नो यांच्या कन्या सुकमावती सुकार्नोपुत्री यांनी इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदु धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. २६ ऑक्टोबर २०२१ला होत असलेल्या एका कार्यक्रमात त्या हिंदु धर्मात प्रवेश करणार आहेत. इंडोनेशिया सीएनएनने हे वृत्त दिले आहे. हा धर्मांतराचा सोहळा ‘सुधी वाडानी’ या नावाने ओळखला जातो.

२६ ऑक्टोबर रोजी सुकमावती सुकार्नोपुत्री इंडोनेशियातील बाली येथील सिंगराजा शहरात औपचारिकपणे इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारणार आहेत. सुकार्नोपुत्री या इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष सुकार्नो त्यांची तिसरी पत्नी फातमावती यांच्या कन्या आहेत. त्या इंडोनेशियाच्या ५व्या राष्ट्राध्यक्ष मेगावती यांच्या बहीण आहेत. त्यामुळे सुकमावती या देशातील एक उच्चस्तरीय व्यक्ती आहेत ज्या हिंदू धर्म स्वीकारण्यास तयार आहेत.

सुकामावती यांच्यावर त्यांच्या आजी इडा आयू न्योमन राय श्रीबेन यांचा अधिक प्रभाव असून त्यांच्या या निर्णयावरही त्यांचा प्रभाव आहे. सुकामावती यांनी यापूर्वीही अनेक हिंदू समारंभांना हजेरी लावली होती आणि हिंदू धर्मातील प्रमुखांशी चर्चाही केली होती. धर्मांतर करण्याच्या त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे.

Exit mobile version