इंग्लंडच्या प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिंबर्गचे निधन

इंग्लंडच्या प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिंबर्गचे निधन

इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिने आपले पती ड्युक ऑफ एडिंबर्ग प्रिन्स फिलीप यांचे निधन झाल्याची घोषणा केली. मृत्युसमयी प्रिन्स फिलिप यांचे वय ९९ वर्षे होते. बकिंगहॅम पॅलेसकडून याबाबत जाहिर करण्यात आलेल्या या पत्रकातून ही माहिती देण्यात आली.

बकिंगहॅम पॅलेसकडून काढण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, “अतिव दुःखाने हर मॅजेस्टी राणी एलिझाबेथ त्यांचे प्रिय पती हिज रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिंबर्ग यांच्या निधनाची बातमी जाहीर करत आहेत. हिज हायनेस आज सकाळी विंडसर कॅसलमध्ये शांतपणे निवर्तले.”

हे ही वाचा:

टेस्लाला भारतात जागेचा शोध

एमपीएससी परीक्षेला कोरोनाचा फटका

ठाकरे सरकारची परिस्थिती ‘नाचता येईना अंगण वाकडे’

प्रिन्स फिलीप आणि एलिझाबेथ यांचा विवाह १९४७ मध्ये झाला होता. त्यानंतर पाच वर्षांनी एलिझाबेथ इंग्लंडची राणी झाली होती. प्रिन्स फिलीप आणि एलिझाबेथ यांना चार मुले, आठ नातू आणि दहा पणतू आहेत.

प्रिन्स फिलिप यांचा जन्म कोर्फु येथे १० जुन १९२१ रोजी झाला होता. त्यांचे पिता ग्रीस आणि डेन्मार्कचे प्रिन्स अँड्र्यु हे किंग जॉर्जचे (पहिला) पुत्र होते. तर त्यांची आई प्रिन्सेस ऍलिस ही लॉर्ड लुईस माऊंटबॅटन यांची मुलगी होती.

रॉयल हायनेस द प्रिन्स फिलीप, ड्युक ऑफ एडिंबर्ग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट केले आहे.

Exit mobile version