ब्रिटनच्या महाराणी दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र प्रिन्स चार्ल्स यांची राजा म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रिन्स चार्ल्स यांनी अधिकृतपणे आज, १० सप्टेंबर रोजी राजाचा पदभार स्वीकारला आहे. सेंट जेम्स पॅलेसमधील बैठकीत चार्ल्स यांना अधिकृतपणे ब्रिटनचे राजे म्हणून जाहीर करण्यात आले आहे .
प्रिन्स चार्ल्स यांना आज राजा म्हणून जाहीर करण्यात आले असून, सेंट जेम्स पॅलेस येथे सोहळ्यात त्यांनी राजा पदाची शपथ घेतली. त्यांचा राज्याभिषक सोहळा काही दिवसांनी होणार आहे. तर आज होणारा कार्यक्रम हा पदग्रहण सोहळा असणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जाते.
प्रिन्स चार्ल्स हे त्यांच्या पत्नीसह त्यांनी ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिज ट्रस यांची भेट घेतली. प्रिन्स चार्ल्स यांनी आपल्या भाषणात दिवंगत महाराणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचे आभार मनात आजीवन जनसेवेचे शपथ घेतली आहे. शिवाय, बर्किंघम पॅलेस बाहेर असलेल्या लोकांची त्यांनी भेट घेत महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनावरील सात्वंना स्वीकारली. महाराणी एलिझाबेथ यांच्याप्रमाणे पुढे आपण काम करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
पिंपरीत गायब झालेल्या मुलाची हत्या
‘याकुब मेमनचा भाऊ रौफसह एका बैठकीत किशोरी पेडणेकर काय करत होत्या?’
राहुल गांधींच्या ४१ हजार रुपयांच्या टी शर्टची चर्चा
बद्रिनाथला मुंबईतील भाविकांची कार दरीत काेसळली आणि
प्रिन्स चार्ल्स राजा म्हणून घोषित झाल्यानंतर जागतिक स्थरावर त्यांचे अभिनंदन केले जात आहे. प्रिन्स चार्ल्स यांनी यावेळी राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्याचा आदेश मंजूर केला आहे. दरम्यान, राणी दुसऱ्या एलिझाबेथ या ब्रिटनच्या राणी म्हणून सात दशके कार्यरत होत्या. वयाच्या ९६ व्या वर्षी एलिझाबेथ यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ब्रिटनचे राजा म्हणून शुक्रवारी पहिल्यांदा प्रिन्स चार्ल्स बर्मिंगहॅम पॅलेसमध्ये दाखल झाले होते.