योगदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतून संदेश

संयुक्त राष्ट्रसंघात करणार योगसाधना

योगदिनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतून संदेश

मंगळवारी रात्री उशिरा अमेरिकेत पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. न्यूयॉर्कच्या जॉन एफ केनेडी विमानतळावर उपस्थित भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकांनी मोदी यांचा जयघोष करत तिरंगा फडकवला. पंतप्रधान मोदी यांनी या भारतीयांशीही चर्चा केली. तर, योगदिनाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी अमेरिकेतून संदेश दिला.

‘जो सर्वांना जोडतो, तो योग अशी व्याख्या आपल्या ऋषीमुनींनी केली आहे. त्यामुळेच योगसाधनेच्या प्रसाराचा उद्देश हा जगभरातील सर्वांना एक कुटुंब म्हणून जोडू पाहण्याचा आहे. योगप्रसाराचा अर्थ आहे ‘वसुधैव कुंटुबकम्’ या भावनेचा विस्तार. त्यामुळेच भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जी २० परिषदेची संकल्पना ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ अशी आहे. याच संकल्पनेवर आधारित आज जगभरातील कोट्यवधी लोक योगसाधना करतील’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

हे ही वाचा:

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावरून ‘बोंबाबोंब’

तलवारबाज भवानीला जयललितांनी दिला होता मदतीचा हात !

देवेंद्र फडणवीस म्हणाले; बंजारा समाजाच्या विकासासाठी सरकार सदैव पाठीशी !

फाल्कन्सनी पटकावले मुंबई प्रीमियर लीग टेबलटेनिसचे विजेतेपद

‘आज भारताच्या स्थानिक वेळेनुसार, संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात होणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी होत आहे. भारताच्या आवाहनानुसार, १८० देश एकत्र येत आहेत, हे ऐतिहासिक आहे. जेव्हा सन २०१४मध्ये संयुक्त राष्ट्रसंघात योगदिनाचा प्रस्ताव आला तेव्हा बहुतेक देशांनी त्याला समर्थन दिले. तेव्हापासून आंतरराष्ट्रीय योग दिनाने एक चळवळीचे रूप धारण केले आहे,’ असे मोदी म्हणाले.

Exit mobile version