सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात

युद्धग्रस्त सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या हक्की पिक्की जमातीच्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा संवाद

सुदानमधून आलेले भारतीय मोदींच्या प्रेमात

ऑपरेशन कावेरी अंतर्गत युद्धग्रस्त सुदानमधून बाहेर काढण्यात आलेल्या हक्की पिक्की जमातीच्या नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शिवमोग्गा येथे संवाद साधला. वेळेवर आणि सुरक्षित सुटका करण्यासाठी सरकारने उचललेल्या सक्रिय पावलांसाठी त्यांनी पंतप्रधानांचे मनापासून आभार मानले.

या नागरिकांनी सुदानमध्ये त्यांना सामोरे जावे लागलेली खडतर परिस्थिती विशद करून सरकार आणि भारतीय दूतावासाने त्यांची सुरक्षा कशी चोख ठेवली, याबाबतची माहिती दिली. ‘आम्हाला एक ओरखडाही पडू नये, याची काळजी सरकारने घेतली आणि हे सर्व पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे झाले,’ असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी महाराणा प्रतापांच्या पाठीशी समाजाचे पूर्वज कसे उभे होते, याची आठवण करून दिली. ते म्हणाले, ‘संपूर्ण जगामध्ये कोणत्याही भारतीयाला कोणत्याही प्रकारची अडचण आली असेल, तर ती समस्या सोडवल्याशिवाय सरकार स्वस्थ बसत नाही. काही राजकारण्यांनी या समस्येचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला मात्र भारतीयांची लपलेली जागा, उघड झाली तर काय, याची चिंता सतावत होती. त्यांना मोठा धोका होता. त्यामुळे सरकारने सर्वांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी शांतपणे काम केले.’ त्यांच्यासाठी उभे राहणाऱ्या, देशाच्या शक्तीला लक्षात ठेवा, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आणि समाज व देशाप्रति योगदान देण्यासाठी त्यांनी सदैव तत्पर राहण्यास सांगितले. परदेशातील लोक भारतीय वैद्यकशास्त्रावर कसा विश्वास ठेवतात आणि ते भारतातील असल्याचे ऐकून आनंदी कसे होतात, याबद्दलही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राहुल म्हणजे एकदिवस सद्दाम, दुसऱ्या दिवशी अमूल बेबी

‘द केरळ स्टोरी’बद्दल चांगलं लिहिलं म्हणून तरुणाला केली मारहाण

‘द केरळ स्टोरी’च्या टीमचे आयुष्य पूर्वीसारखे राहणार नाही, असं विवेक अग्निहोत्री का म्हणाले?

लष्करी परेडवर केलेल्या हल्ल्याबद्दल तेहरानमध्ये इराणी-स्विडिश नागरिकाला फाशी

ऑपरेशन कावेरी अंतर्गत युद्धग्रस्त सुदानमधून तब्बल तीन हजार ८६२ व्यक्तींची सुटका करण्यात आली आहे. ही मोहीम आता संपुष्टात आली आहे. जेद्दाह येथील एका शाळेत तयार करण्यात आलेली संक्रमण शिबिराची सुविधाही बंद करण्यात आली आहे, अशी माहिती सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाने दिली. भारत सरकारने पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय नागरिकांना संघर्षातून वाचवण्यासाठी ऑपरेशन कावेरी सुरू केले होते.

Exit mobile version