जगात भारी पंतप्रधान मोदी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत.

जगात भारी पंतप्रधान मोदी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. नुकताच जागतिक रेटिंग जागतिक रेटिंगचा अहवाल समोर आला असून यामध्ये नरेंद्र मोदी हे प्रथम स्थानी आहेत. अमेरिकेतील डेटा इंटेलिजेंट फर्म ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या अहवालानुसार नरेंद्र मोदी हे ७५ टक्क्यांसाह प्रथम स्थानी आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून निवडून आलेले आहेत. ‘द मॉर्निंग कन्सल्ट’च्या सर्वेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रूव्हल रेटिंगमध्ये प्रथम स्थानी असून त्यांनी प्रमुख देशातील नेत्यांना मागे टाकत हे स्थान मिळवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यासह २२ देशांच्या नेत्यांना मागे सोडत पंतप्रधान मोदींनी अव्वल क्रमांक पटकावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अप्रूव्हल रेटिंग हे ७५ टक्के आहे. तर दुसऱ्या स्थानी ६३ टक्क्यांसह मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेस मेनुएल लोपेज ओब्रोडोर आहेत. इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी हे ५४ टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहेत. हा सर्वे यंदाच्या वर्षी १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्टच्या काळात करण्यात आला होता. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे ४१ टक्के रेटिंगसह ११ व्या स्थानी आहेत.

हे ही वाचा:

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

नौशेरामधून लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक

यापूर्वी जानेवारी २०२२ मध्ये आणि नोव्हेंबर २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. राजकीय निवडणुका, निवडून आलेले अधिकारी आणि मतदानाच्या मुद्द्यांवर हा सर्व्हे केला जातो. यासाठी, मॉर्निंग कन्सल्टकडून दररोज २० हजारपेक्षा जास्त जागतिक मुलाखती घेण्यात येतात.

Exit mobile version