‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला

फेब्रुवारी महिन्यात पार पडणार शिखर परिषद

‘AI ऍक्शन’साठी पंतप्रधान मोदी जाणार फ्रान्सला

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेब्रुवारी महिन्यात फ्रान्स दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पंतप्रधान मोदी हे फ्रान्समध्ये १० आणि ११ फेब्रुवारी दरम्यान आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) ऍक्शन समिटमध्ये सहभागी होणार आहेत, अशी घोषणा फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली.

मॅक्रॉन म्हणाले की, फ्रान्स १० आणि ११ फेब्रुवारी रोजी AI समिटचे आयोजन करणार आहे. या शिखर परिषदेत AI वर आंतरराष्ट्रीय पातळीवर संभाषण होऊ शकेल. पंतप्रधान मोदी हे आपल्या देशातील एका मोठ्या दौऱ्यावर असतील कारण आम्हाला AI वर सर्व शक्तींशी संवाद साधायचा आहे. तसेच त्यांनी जागतिक संभाषण म्हणून AI च्या महत्त्वावर जोर दिला आणि सांगितले की यात अमेरिका, चीन आणि भारत यांसारखे देश तसेच AI तंत्रज्ञान विकसित आणि नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या आखाती देशांचा समावेश असेल.

मॅक्रॉन म्हणाले, अमेरिका, चीन आणि भारतासारख्या प्रमुख उदयोन्मुख देशांची तसेच आखाती देशांची यात महत्त्वाची भूमिका आहे. मॅक्रॉन यांनी हे देखील अधोरेखित केले की, ही शिखर परिषद नावीन्य, प्रतिभा आणि फ्रान्ससह युरोपला जागतिक AI लँडस्केपच्या केंद्रस्थानी ठेवण्यावर लक्ष केंद्रित करेल. माझ्यासाठी शिखर परिषदेचा गाभा आहे की, नावीन्यपूर्ण आणि प्रतिभा आकर्षित करण्याची क्षमता विकसित करणे आणि AI च्या केंद्रस्थानी फ्रान्स आणि युरोप असणे.

हे ही वाचा : 

काय होईल ते होईल, आम्ही सगळ्या पालिका निवडणुका स्वबळावर लढू!

हिंदू आध्यात्मिक मेळाव्याच्या तिसऱ्या दिवशी अमृतमयी गो भारती संमेलन, वनवासी कल्याण आश्रमचे कार्यक्रम

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; याचं दिवशी करोडो हिंदूंची झाली होती स्वप्नपूर्ती!

श्रीराम कृपेने मिळाली सजावटीची सौंदर्यदृष्टी!

विशेष म्हणजे, यापूर्वीचं फ्रेंच प्रेसीडेंसीने भारताला ‘अत्यंत महत्त्वाचा देश’ असे वर्णन करून डिसेंबरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिटसाठी भारताच्या निमंत्रणाची पुष्टी केली होती. या परिषदेबाबत पत्रकार परिषदेत फ्रेंच प्रेसिडेंसीने जाहीर केले की भारतासह ९० देशांना सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारत हा लोकांच्या जीवनावर ठोस प्रभाव पाडण्याच्या त्याच्या क्षमतेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाचा देश आहे. आम्ही शिखर परिषदेच्या विविध संघांमध्ये भारताच्या योगदानाची अपेक्षा करतो, फ्रेंच प्रेसीडेंसीने म्हटले आहे. हा कार्यक्रम पाच प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित करेल: AI मधील सार्वजनिक हित, कामाचे भविष्य, नाविन्य आणि संस्कृती, AI वर विश्वास आणि जागतिक AI प्रशासन.

Exit mobile version