रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू झालेल्या युद्धानंतर भारताच्या बाजारपेठेत संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धानंतर निर्माण झालेल्या नव्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहेत. या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.
या बैठकीत रशिया-युक्रेन संकटाचा आर्थिक परिणाम आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा प्रभाव कमी करण्याच्या मार्गांवर चर्चा होणार आहे. युक्रेनने भारत सरकारला मदतीचे आवाहन केले होते. त्यानंतर यूपीमध्ये निवडणुकीच्या दौऱ्यावर असलेल्या पीएम मोदींनी युक्रेनच्या संकटासंदर्भात बैठक बोलावली आहे.
दरम्यान, युक्रेन-रशिया युद्ध वाढत असताना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही मुरलीधरन म्हणाले की, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय विद्यार्थ्यांसह सुमारे १८ हजार भारतीयांना युक्रेनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांनी पंतप्रधानांकडे मुलांना भारतात आणण्याची विनंती केली आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने आतापर्यंत अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी
‘नवाब मलिकांना एक क्षणही मंत्रीपदावर ठेवले जाऊ नये’
रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात…
भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल…
तसेच केंद्र सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी २४ तासांची हेल्पलाइन सुरु केली आहे. दिल्लीमध्ये २४ तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आले आहे. भारताकजे २४ हजार विध्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. भारतीय दूतावासाने युक्रेनमधील भारतीय नागरिकांसाठी तिसरा सुरक्षा सल्ला जारी केला आहे.