मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा

२०२४च्या निवडणुकीत हॅट्ट्रिक करतील अशी खात्री

मोदीच येणार! द गार्डीयनचाही दावा

देशातील लोकसभा निवडणुकीसाठीची लगभग सुरू झालेली असताना आता सर्वच राजकीय पक्ष सार्वत्रिक निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, ब्रिटनमधील प्रमुख वृत्तपत्र ‘द गार्डियन’ने भारतातील निवडणुकांच्या निकालाबद्दल दावा केला आहे. या वृत्तपत्रात एक लेख लिहिला गेला असून, यामुळे भारतातील निवडणुकांच्या निकालाकडे जगाचं लक्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे. या लेखात असा दावा करण्यात आला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२४ मध्ये पंतप्रधानपदाची हॅट्रिक करतील.

सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं अशक्य

‘द गार्डियन’मधील हा लेख हॅना अॅलिस पीटरसन यांनी लिहिला आहे. पीटरसन लिहितात की, “तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे मिळालेला आत्मविश्वास, पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे भाजपा सलग तिसऱ्यांदा सत्तेत येणार हे निश्चित आहे. त्यांना थांबवणे जवळजवळ अशक्य आहे.” भारताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आणि राजकीय विश्लेषकांमध्ये एक प्रकारचे एकमत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा विजय निश्चित आहे.

पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेमुळे लोक प्रभावित

पीटरसन पुढे लिहितात की पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता, एक मजबूत नेता म्हणून त्यांची प्रतिमा, तसेच भाजपच्या हिंदू राष्ट्रवादी अजेंडा यामुळे लोक प्रभावित झाले आहेत. विशेषत: उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यातील हिंदू मतदार मोठ्या संख्येने प्रभावित झालेले आहेत. २०१४ पासून राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर देशातील जनमत मोठ्या प्रमाणात भाजपाकडे झुकले आहे. पण, भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात भाजपापेक्षा विरोधी पक्ष ताकदवान आहेत, पण राष्ट्रीय पातळीवर विरोधक विखुरलेले आणि कमकुवत दिसतात, असं निरीक्षणही लेखात नोंदविण्यात आले आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाचा दणदणीत विजय झाला आहे. यामुळे २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अधिक बळ मिळाले आहे, असं लेखात म्हटले आहे.

हे ही वाचा:

इस्रोकडून भारतीयांना नव्या वर्षाची भेट; XPoSAT चे यशस्वी प्रक्षेपण!

आग्राची महिला प्रभू रामांच्या मूर्तीसाठी विणत आहे रेशीम वस्त्रे!

मशिदीत ११ वेळा ‘श्री राम जय राम, जय जय राम’ जप करा!

‘टीम इंडियाचे नक्कीच काहीतरी बिनसलेय…’

विरोधी पक्षांचे अद्याप एकमत नाही

या लेखात काँग्रेसबद्दल लिहिले आहे की, “भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये विजय मिळवला आहे. काँग्रेस पक्ष अंतर्गत कलहाचा सामना करत आहे. विरोधी पक्षांनी युती केली असली तरी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधी पक्षांचे अद्याप एकमत झालेले नाही. मात्र, हे सर्व पक्ष भाजपा विरोधात लढणार असल्याची चर्चा आहे. सध्या भाजपाचा विजय निश्चित दिसत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.”

Exit mobile version