ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

ब्राझील मधील जी- २० शिखर परिषदेत सहभागी होणार

ब्राझीलमध्ये पंतप्रधान मोदींचे संस्कृत मंत्रोच्चाराने स्वागत!

पंतप्रधान नरेंद मोदी हे तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला ब्राझीलमध्ये आयोजित १९ व्या जी-२० नेत्यांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. यासाठी त्यांचे ब्राझीलमध्ये आगमन झाले असून तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले आहे.

नायजेरिया देशाचा पहिला दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार, १८ नोव्हेंबर रोजी ब्राझीलला पोहोचले. नरेंद्र मोदी ब्राझील मधील जी- २० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे ब्राझीलमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. ब्राझीलमधील भारतीय समुदायाचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी हॉटेलबाहेर जमले होते. अनेकांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास भेटवस्तू आणल्या होत्या. तर, अनेकांनी तिरंग्यासह उपस्थिती लावली होती. याशिवाय नरेंद्र मोदी यांचे संस्कृत मंत्रोच्चारानेही स्वागत करण्यात आले.

ब्राझीलला पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, “मी जी- २० शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो येथे पोहोचलो आहे. या शिखर परिषदेत विविध जागतिक नेत्यांसोबत चर्चा महत्त्वाची ठरेल, अशी मला आशा आहे.”

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले होते. १६ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत ते या तीन देशांच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. नायजेरिया देशाच्या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांना नायजेरियाचा दुसरा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने गौरव होणारे नरेंद्र मोदी हे दुसरे परदेशी व्यक्ती आहेत.

हे ही वाचा : 

दिल्लीत प्रदूषणाची पातळी ‘गंभीर’; ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू

इस्रायलकडून हिजबुल्लाच्या मीडिया संबंध प्रमुखाचा खात्मा

पंतप्रधान मोदींकडून ‘द साबरमती रिपोर्ट’चे कौतुक, म्हणाले- ‘सत्य बाहेर येत आहे’

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद इरफान अली यांच्या निमंत्रणावरून गयानाला जाणार आहेत. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळात भारतीय पंतप्रधानांची गयानाला होणारी ही पहिली भेट असणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी दुसऱ्या भारत- कॅरिकॉम शिखर परिषदेला उपस्थित राहतील, जिथे ते कॅरिबियन राष्ट्रांच्या नेत्यांशी ऐतिहासिक संबंधांचे नूतनीकरण करण्यासाठी आणि सखोल सहकार्याच्या संधी शोधण्यासाठी भेटतील.

Exit mobile version