भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात नुकतेच रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी रशियाचा दौरा पूर्ण केला असून ते आता ऑस्ट्रिया येथे पोहचले आहेत. रशिया दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे पोहोचले. ऑस्ट्रियामध्ये पंतप्रधान मोदी यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ऑस्ट्रिया स्थानिक वेळेनुसार) ऑस्ट्रियामध्ये पोहोचले आणि ऑस्ट्रियातील भारतीय राजदूत शंभू कुमारन आणि ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग यांनी त्यांचे स्वागत केले. नंतर, ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी आयोजित केलेल्या डिनरला ते उपस्थित राहिले, जिथे त्यांचे भारतीय डायस्पोरा सदस्यांनी स्वागत केले. हॉटेलमध्ये ऑस्ट्रियन कलाकारांनी नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘वंदे मातरम’ हे गीत वाजवले, याचा व्हिडीओ नरेंद्र मोदींनी ट्विटरवर शेअर केला आहे.
नरेंद्र मोदींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “ऑस्ट्रिया आपल्या अप्रतिम संगीत संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे, वंदे मातरमचे राष्ट्रीय गीत ऐकायला मिळाले, यासाठी मी आभारी आहे. हा खूप मोठा अनुभव आणि एक मोठा सन्मान आहे,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
Austria is known for its vibrant musical culture. I got a glimpse of it thanks to this amazing rendition of Vande Mataram! pic.twitter.com/XMjmQhA06R
— Narendra Modi (@narendramodi) July 10, 2024
हे ही वाचा:
दारू पिऊन वाहन चालवल्यास लायसन्स होणार रद्द
उत्तर प्रदेशात बसची दुधाच्या टँकरला धडक; अपघातात १८ जणांचा मृत्यू
मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का
तेजस ठाकरे अंबानींच्या कार्यक्रमात नाचले, झाली टीका!
दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशातील सर्वात प्रतिष्ठित नागरी सन्मान ‘द ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल’ देऊन अधिकृतपणे सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानत हा १४० कोटी भारतीयांचा सन्मान असल्याच्या भावना व्यक्त केल्या.