पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

एक्सवर पोस्ट करत मांडली भूमिका

पंतप्रधान मोदींकडून मॉस्कोतील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मॉस्कोसह जग हादरलं आहे. एका कॉन्सर्ट हॉलमध्ये पाच बंदुकधारी लोक घुसले आणि त्यांनी गोळीबार सुरु केला. या गोळीबारात आतापर्यंत ६० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १४५ लोक या गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत. शिवाय या कॉन्सर्ट हॉलमध्ये आणखी काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. तर, घटनास्थळावरून १०० नागरिकांना दंगल विरोधी पथकाने वाचविले आहे. या हल्ल्याच्या काही वेळानंतर इसिस दहशतवादी संघटनेने याची जबाबदारी स्वीकारली आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्ही मॉस्कोमधील दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. पीडितांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत. या दुःखाच्या प्रसंगी भारत सरकार रशियन फेडरेशनच्या लोकांसोबत एकजुटीने उभा आहे,” असा दिलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियन नागरिकांना दिला आहे.

मॉस्कोमध्ये म्युझिक कॉन्सर्टसाठी हजारो लोक एकत्र जमले होते. यावेळी पाच हल्लेखोरांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण जागीच ठार झाले. हे हल्लेखोर तब्बल १५ ते २० मिनिटे गोळीबार करत होते. यानंतर अचानक कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लागली आणि स्फोटांचा आवाज झाला. यामध्ये ६० जण ठार झाले.

हे ही वाचा:

कर्णधार ऋतुराजची विजयी सलामी

इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांचा मॉस्कोमध्ये हल्ला; १४० जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींचे भूतानमध्ये भव्य स्वागत!

केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली

रशियन वृत्तानुसार, या हल्लेखोरांनी मोठ्या प्रणाणात स्फोटके फोडली. कॉन्सर्ट हॉलमध्ये आग लावली. तर सोशल मीडियावरील व्हिडीओमध्ये इमारतीवरून धुराचे मोठमोठे लोट दिसून येत आहेत. हे हल्लेखोर सैनिकांच्या गणवेशात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. रशियन सैन्यानेही दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

Exit mobile version