‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाच्या भाऊ- बहिणीचे केले कौतुक

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींनी टांझानियाच्या भाऊ- बहिणीचे केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ मध्ये टांझानियाच्या टिकटॉक स्टार्स किली आणि नीमाबद्दल बोलले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “भारतीय संस्कृती आणि आपल्या परंपरेबद्दल बोलताना, आज मला ‘मन की बात’मध्ये दोन लोकांशी तुमची ओळख करून द्यायची आहे.”

टांझानियन भावंडे किली पॉल आणि तिची बहीण निमा यांची फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खूप चर्चा आहे. त्यांच्याबद्दल सर्वांनी ऐकले असेलच, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान पुढे म्हणतात की, किली पॉल आणि नीमा यांना भारतीय संगीताची आवड आहे आणि म्हणूनच ते खूप लोकप्रियही आहेत.

टांझानियाच्या किली आणि नीमा यांनी भारतीय संगीताची आवड दाखवली. त्यांनी लता दीदींना आदरांजली वाहिली, आमचे राष्ट्रगीत गायले. त्यांचा मी ऋणी आहे, असे मोदी म्हणाले. किली आणि नीमा ही टांझानियामधील भाऊ- बहिणीची जोडी आहे. त्यांनी ऑन-पॉइंट लिप-सिंक व्हिडिओ आणि कोरिओग्राफीने नेटिझन्सची मने जिंकली आहेत. किली पॉलचे इंस्टाग्रामवर २.६ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी २५९ हजार लोक नीमा पॉलला फॉलो करतात.

हे ही वाचा:

एलोन मस्क यांनी युक्रेनला केली ‘ही’ मदत

भाजपा खासदार जेपी नड्डा यांचे ‘या’ कारणासाठी ट्विटर हॅक

‘परदेशात गेलेला आपला वारसा परत आणणे ही आपली जबाबदारी’

उत्तर प्रदेशमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान सुरू

किली पॉल आणि निमा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हिंदी गाण्यांवरील लिपसिंक व्हिडिओ आणि डान्स व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच पॉल आणि त्याची बहीण नीमा यांनी पारंपारिक मसाई ड्रेस परिधान करून, ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘राता लांबिया’ गाण्यावर लिपसिंकचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. आफ्रिकन देश टांझानियाची डान्सिंग स्टार कायली पॉल हिला नुकताच टांझानियास्थित भारतीय उच्चायुक्तालयाने सन्मानित केले आहे.

Exit mobile version