पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या चार दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांशी, उद्योजकांशी आणि अमेरिकेतील अनेक दिग्गजांशी संवाद साधला. चार दिवसांच्या या यशस्वी अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्तला रवाना झाले आहेत.
पंतप्रधान कार्यालयाने नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी इजिप्तला रवाना असं कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ६ वाजता इजिप्त दौऱ्यावर निघाले. ते संध्याकाळी ५.५५ वाजता कैरो विमानतळावर पोहचणार आहेत. तिथे पंतप्रधान मोदींचे स्वागत केले जाईल. त्यानंतर इजिप्तचे पंतप्रधानांसोबत नरेंद्र मोदींची चर्चा होईल. तर, रात्री ९ वाजता दोन्ही देशांच्या वरिष्ट अधिकऱ्यांसोबत चर्चा होणार आहे. रात्री ९.३० वाजता भारतीय समुदायासोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील.
After the successful visit to the USA, PM @narendramodi emplanes for Egypt. pic.twitter.com/a5YX446nTG
— PMO India (@PMOIndia) June 24, 2023
त्यानंतरही पंतप्रधान मोदी वरिष्ठ नेत्यांसह चर्चा करणार आहेत. दोन दिवसाच्या या दौऱ्यात पंतप्रधान मोदी इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल अल सीसी यांच्या सोबत अनेक करारांवर चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा पहिला इजिप्त दौरा आहे. दोन्ही देशांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे.
हे ही वाचा:
पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचवी, आठवीच्या परीक्षेत पास व्हावचं लागणार!
‘प्लेन हायजॅक का प्लॅन है’ असा संवाद साधणाऱ्या प्रवाशाला अटक
गेल्या वर्षी मुंबईत मॅनहोलची झाकणे पळवण्याचा विक्रम
मुंबई, पुण्यात बॉम्बस्फोट करणार, मुंबई पोलिसांना धमकी
इजिप्त आणि भारताचे चांगले संबंध आहेत. या अगोदर १९९७ ला भारताचे पंतप्रधान इजिप्तच्या दौऱ्यावर गेले होते, तर दुसरीकडे इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल-सिसी २०१५, २०१६ आणि २०२३ ला प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य अतिथी म्हणून भारतात आले होते.