पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर होते. फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडला हजेरी लावून पंतप्रधान मोदी शनिवार, १५ जुलै रोजी सकाळी फ्रान्समधून थेट संयुक्त अरब अमिरातीला रवाना झाले. या दौऱ्यात ते यूएईचे राष्ट्रपती आणि अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींनी या दौऱ्यापूर्वी स्पष्ट केलं होतं की, शेख मोहम्मद बिन जायद हे दोन्ही देशांच्या भागीदारीच्या भविष्यासाठी तयार करण्यात आलेल्या रोडमॅपशी सहमत आहोत. या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे करता येतील, याबाबत चर्चा करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं मोदींनी म्हटलं होतं.
हे ही वाचा:
आशियाई स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर
कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!
ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!
पंतप्रधान मोदींचे वेळापत्रक असे असेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १०.४५ वाजेपर्यंत यूएईला पोहोचतील. त्यानंतर दुपारी २.१० वाजता त्यांचे औपचारिक स्वागत होईल. पुढे दुपारी ३.२० वाजता ते औपचारिक भोजनासाठी उपस्थित राहतील. त्यानंतर ४.४५ वाजता ते दिल्लीसाठी रवाना होतील.
फ्रान्स दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी फ्रान्समध्ये बॅस्टिल डे परेडला उपस्थिती दर्शवली. या दौऱ्यामध्ये त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा देखील केली. नरेंद्र मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ग्रँड क्रॉस ऑफ दि लीजन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.