पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर

पंतप्रधान मोदींनी बायडन दाम्पत्याला दिल्या ‘या’ भेटवस्तू

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्यांचा हा अमेरिका दौरा चांगलाच चर्चेत आहे. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी त्यांना भारतातील काही खास वस्तू भेट म्हणून दिल्या. भारतातील दहा राज्यातील महत्त्वाच्या वस्तू मोदी यांनी बायडेन दाम्पत्याला भेट दिल्या. तसेच जिल बायडेन यांना एक खास हिराही भेट म्हणून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा हिरवा हिरा भेट म्हणून दिला. हा हिरा पृथ्वीवरील ऑप्टिकल आणि रासायनिक गुण दर्शवतो. हा हिरा पर्यावरण अनुकूलही आहे. या हिऱ्याच्या निर्मितीसाठी पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. उपनिषदाची दहा तत्त्वे या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीसोबतच बायडेन यांना जयपूरच्या कारागिरांनी बनवलेली चंदनाची खास पेटी भेट देण्यात आली. या पेटीच्या आत गणपतीची मूर्ती आणि दिवा तसेच दहा वस्तू आहेत.

कोणत्या वस्तू भेट म्हणून दिल्या?

हे ही वाचा:

कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून दोन पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी

पाटण्यातील बैठकीपूर्वी विरोधकांना दणका, एचएएमचे जीतन राम मांझींचा भाजपाला पाठींबा

…आणि पोलीस ठाण्याचे बँक खाते बँक कर्मचाऱ्यानेच केले साफ

राज्यातील साडेतीन लाख युवक-युवतींना मिळणार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ !

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हाईट हाऊसमध्ये प्रचंड जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी बायडन दाम्पत्याचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आभार मानत म्हटले की, जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या आदर आणि सत्काराबद्दल धन्यवाद.

Exit mobile version