भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सुरीनाम प्रजासत्ताकचे अध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांनी सोमवार, ५ जून रोजी मुर्मू यांना ‘द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार’ हा पुरस्कार प्रदान केला. या पुरस्काराने सन्मानित झालेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या भारतीय महिला आहेत.
पुरस्कार मिळाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त करत म्हटले की, ‘हा सन्मान केवळ माझ्यासाठीच नाही तर भारतातील १४० कोटी लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.’
Suriname confers highest civilian award to President Droupadi Murmu
Read @ANI Story | https://t.co/pyMGScz1dX#Suriname #India #DroupadiMurmu pic.twitter.com/3z3Mu0xAkb
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2023
भारत आणि सुरीनाम यांनी सोमवारी आरोग्य, कृषी आणि क्षमता निर्माण या क्षेत्रातील तीन महत्त्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. राष्ट्रपती मुर्मू आणि सुरीनामचे समकक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांच्यात शिष्टमंडळ-स्तरीय चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात संतोखी यांची भेट घेतली.
हे ही वाचा:
किल्ले रायगडावर शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण! अडीच लाख शिवभक्त जमले
३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त विशेष टपाल तिकीट!
३२ वर्षांपूर्वी केलेल्या हत्येसाठी माफिया मुख्तार अन्सारीला जन्मठेप! काय आहे नेमकं प्रकरण?
भारताप्रमाणेच सुरीनाममध्येही अनेक जाती, धर्म आणि भाषांचे लोक राहतात. भारत आणि सुरीनाममधील मैत्री ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांवर आधारित आहे. मात्र, दोन्ही देशांमधील व्यापार क्षमतेपेक्षा खूपच कमी आहे. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी सहकार्य वाढवण्याची गरज आहे. संरक्षण, आयुर्वेद आणि फार्मा क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढवता येईल, असे मत मुर्मू यांनी व्यक्त केले.