टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताचा विजयरथ सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एकदा भारतासाठी टोकियो मधून खुशखबर आली आहे. टी ६४ उंच उडी या प्रकारात भारताचा खेळाडू प्रवीण कुमार याने रौप्य पदक पटकावले आहे. प्रवीणच्या या कामगिरीमुळे भारताने कमावलेल्या एकूण पदकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात भारताने आजवर केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. पहिल्यांदाच भारताने दोन आकडी पदकांची कमाई केली आहे.
टी ६४ उंच उडी प्रकारात २.०७ मीटर उडी मारत प्रवीण कुमारने रौप्य पदकावर आपले नाव कोरले. तर ग्रेट ब्रिटनचा ॲथलिट जोनथन हा सुवर्ण पदाचा मानकरी ठरला. त्याने २.१० मीटर इतकी उंच उडी मारून सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केले.
हे ही वाचा:
देशात शाळा झाल्या सुरू; महाराष्ट्राचे काय?
२०२५ पर्यंत होणार क्षयरोग मुक्त भारत
रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग
प्रवीणने या कामगिरी सोबतच नवा आशिया विक्रम नोंदवला आहे. या आधीही पॅरा ॲथलिट्स मधील उंच उडी या प्रकारातील आशिया विक्रम हा प्रवीण च्या नावावर होता. २.०५ इतकी उंच उडी मारत त्याने हा विक्रम नोंदवला होता. तर आता पॅरालिम्पिक २०२० मधील सादरिकरणाने त्याने स्वतःचाच जुना विक्रम मोडला आहे.
प्रवीणच्या या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची पाठ थोपटली आहे. ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी प्रवीणचे अभिनंदन केले आहे. प्रवीण कुमारचा आम्हाला अभिमान आहे असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Proud of Praveen Kumar for winning the Silver medal at the #Paralympics. This medal is the result of his hard work and unparalleled dedication. Congratulations to him. Best wishes for his future endeavours. #Praise4Para
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2021