23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरदेश दुनियाकार्लसनने वर्ल्डकप जिंकला, प्रज्ञानंदने जिंकली मने

कार्लसनने वर्ल्डकप जिंकला, प्रज्ञानंदने जिंकली मने

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत टायब्रेकरमध्ये झाली झुंज

Google News Follow

Related

एकीकडे चांद्रयान ३ यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्यानंतर जगभरात कौतुकाचा वर्षाव होत असताना बुद्धिबळ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत खेळत असलेला रमेशबाबू प्रज्ञानंद याच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागून राहिले होते. पण त्याला जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनकडून टायब्रेकरमध्ये १.५-०.५ असा पराभव पत्करावा लागल्याने विश्वविजेतेपदाला गवसणी घालण्याचे स्वप्न भंगले.

 

 

प्रज्ञानंदने फायनलच्या तिसऱ्या फेरीत जोरदार प्रयत्न केले खरे पण कार्लसनचा अनुभव आणि अखेरच्या टप्प्यात आपला खेळ उंचावण्याच्या हातोटीमुळे त्याला यश मिळविता आले नाही. कार्लसनने आपले पहिले वर्ल्डकप विजेतेपद यानिमित्ताने पटकाविले. त्याच्या खात्यात याआधीच जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची पाच विजेतीपदे आहेत.

 

 

पहिले दोन्ही डाव बरोबरीत सुटल्यानंतर टायब्रेकरकडे सर्वांचे लक्ष होते. त्यात अवघ्या २२ चालीत निकाल लागला. कार्लसनने पहिला टायब्रेकर गेम जिंकून पकड मिळविली. विशेष म्हणजे प्रतिस्पर्ध्याच्या मनात काय चालले आहे, हे समजण्याचे कौशल्य त्याच्यापाशी असल्याचे या लढतीत दिसून आले. तिकडे प्रज्ञानंदनेही आपल्या गुणवत्तेची चुणूक या संपूर्ण स्पर्धेत दाखवून दिली. त्याने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या हिकारु नाकामुरा व तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या फॅबिआनो कारुआना यांना नमविले. त्यामुळे त्याला अंतिम फेरीत धडक मारता आली. प्रज्ञानंदच्या या कामगिरीमुळे जागतिक स्तरावर त्याचे खूप कौतुकही झाले.

 

 

प्रज्ञानंदला पराभव पत्करावा लागला असला तरी पुढच्या वर्षी होणाऱ्या कॅन्डिडेट गेमसाठी त्याला प्रवेश मिळाला आहे. कॅनडात ही स्पर्धा होणार आहे. या कामगिरीमुळे एक गुणवत्तावान आणि वयाने लहान असलेला खेळाडू जागतिक स्तरावर उदय होताना पाहायला मिळाला आहे. बॉबी फिशर, कार्लसन यांच्यानंतर असे यश मिळविणारा प्रज्ञानंद हा तिसरा खेळाडू ठरला आहे.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे झाले आहेत स्वस्तातले पवार

३७० कलमात मणिपूरचा मुद्दा घुसडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न हाणून पाडला

१६ आमदारांकडून नार्वेकरांना ६ हजार पानी उत्तर

वरळीत कोळी महिलांना मासे विक्री करण्यास अडचणी

 

पाचवेळा विश्वविजेता ठरलेला भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने प्रज्ञानंदने कॅन्डिडेट स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे आणि हा एक उत्कृष्ट निकाल आहे, असे म्हटले आहे. तर त्याने कार्लसनचेही कौतुक केले. शेवटी मॅग्नसने दाखवून दिले. त्याच्या सातत्याला फळ आले. ज्या स्पर्धेच्या विजेतेपदापासून तो दूर राहिला होता, ती स्पर्धा अखेर त्याने जिंकली. कार्लसनचे खूप खूप अभिनंदन, अशा शब्दांत आनंदने त्याचे कौतुक केले.

 

 

प्रज्ञानंदचे प्रशिक्षक आरबी रमेश म्हणाले की, कार्लसनचे अभिनंदन. या विजेतेपदासाठी तो पात्र होता. प्रज्ञानंदचेही अभिनंदन. अनेक आठवणी आहेत. काही महत्त्वाचे धडेही यातून मिळाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा