अमेरिकेला बर्फाच्या वादळाचा तडाखा , बत्ती गुल, वाहतूक विस्कळीत

१८ जणांचा मृत्यू

अमेरिकेला बर्फाच्या वादळाचा तडाखा , बत्ती गुल, वाहतूक विस्कळीत

अमेरिकेत बर्फाचे वादळ कहर केला आहे. आर्क्टिकमधील जोरदार वादळामुळे संपूर्ण देशात कडाक्याच्या थंडीमुळे आतापर्यंत १८जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो घरे आणि कंपन्यांचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. ऐन नाताळाच्या तोंडावर बर्फाच्या वादळाचा फटका बसल्यामुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.हिवाळी वादळाचे चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.

तापमानात घट, जोरदार थंड वारे आणि बर्फवृष्टी यामुळे थंडी झपाट्याने वाढत आहे. देशातील बफेलो आणि न्यूयॉर्क शहरामध्ये आपत्कालीन सेवा देखील ठप्प झाल्या आहेत. शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळही बंद ठेवण्यात आले आहेत. वादळामुळे अनेक ठिकाणी कर अपघात, झाडे पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत . अमेरिकेतील चायन शहरामध्ये अवघ्या अर्ध्या तासात पारा ४० अंशांपर्यंत घसरला. हे शहर वायोमिंग राज्यात येते. येथे २४ तासांत तापमानात ५१ अंशांपर्यंत घसरण दिसून आली.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी वादळाला गांभीर्याने घ्या असा सल्ला दिला आहे.. नाताळच्या सुट्टीच्या प्रवासावरही या वादळाचा परिणाम होत आहे. या हंगामात झालेल्या बर्फ वृष्टीमुळे अनेक लीक आजारी पडली आहेत. त्यापैकी १ लाख ९० हजार लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून फ्लूमुळे १२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. बर्फाच्या वादळामुळे अमेरिकेतील रेल्वे वाहतुकीवरही वाईट परिणाम झाला असून, शेकडो गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Exit mobile version