पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये देखील गेल्या तब्बल तीन तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे.पाकिस्तानात गेल्या तीन तासांपासून बत्ती गुल झाली आहे. इस्लामाबाद, लाहोर आणि कराचीच्या महत्त्वपूर्ण शहरांमध्ये देखील गेल्या तब्बल तीन तासांपासून वीज पुरवठा खंडीत झाला आहे. तर अचानक विद्युत पुरवठा खंडीत होण्यामागचं कारण अजून तरी पुढे आलेलं नाही. पण पाकिस्तान सारख्या मोठ्या देशातील महत्वपूर्ण शहरांची अचानक अशी बत्ती गुल होणं ही लक्षणीय बाब आहे.
महागाई आणि आर्थिक संकटाशी झगडणाऱ्या पाकिस्तानला आता वीज संकटाला देखील तोंड द्यावे लागत आहे. सोमवारी संपूर्ण पाकिस्तानात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. इस्लामाबाद, लाहोर आणि कराची या शहरांमध्ये अनेक तासांपासून वीज नाही.ऊर्जा मंत्रालयाने सांगितले की, नॅशनल ग्रीड सकाळी ७.३४ वाजता डाऊन झाल्याने वीज यंत्रणा बिघडली. मंत्रालयाने सांगितले की, यंत्रणेतील बिघाड सुधारण्यासाठी वेगाने काम केले जात आहे.
दुरूस्तीसाठी लागतील आठ ते दहा तास
उर्जा मंत्री खुर्रम दस्तागीर यांनी जिओ न्यूजला सांगितले की, वीज बचतीसाठी हिवाळ्यात पाकिस्तानामध्ये वीजनिर्मिती युनिट्स बंद ठेवले जातात. सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जेव्हा यंत्रणा चालू केली तेव्हा उत्तर पाकिस्तानातील क्षेत्राच्या व्होल्टेजमध्ये दबाव आला. त्यामुळे एकामागून एक अशी यंत्रणेत बिघाड होत गेली. माध्यमांद्वारे सांगण्यात येत आहे की, वीज यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी आठ ते दहा तास लागू शकतात. त्यामुळे लोकांना वीजेविना काही तास राहावे लागणार आहे.
हे ही वाचा:
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेची भेट
ऐनवेळी गोळीचं सुटली नाही, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष गोळीबारात बचावले
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बीसीसीच्या माहितीपटाला भारतात बंदी
उद्धव ठाकरे बाद, आता राहुल पंतप्रधान!
बलुचिस्तानमध्ये २२ जिल्हे विजेविना
जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, क्वेटा वीज पुरवठा कंपनीने सांगितले की, बलुचिस्तानमधील २२ शहरात सकाळपासून वीज गेलेली आहे. गुड्डू ते क्वेटा दरम्यानच्या पुरवठा लाईनमध्ये समस्या निर्माण झाली असल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
गतवर्षी बारा तास वीजपुरवठा खंडित झाला होता
पाकिस्तानने यावर्षी नवीन ऊर्जा योजना आणली आहे. गेल्यावर्षी देखील ऑक्टोबरमध्येही पाकिस्तानमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर कराची, लाहोरसारख्या शहरांमध्ये सुमारे बारा तास वीजपुरवठा खंडित झाला होता.