पोर्तुगालची राजधानी लिस्बन येथे मंगळवार, ३० ऑगस्टला एका ३४ वर्षीय गर्भवती भारतीय महिला पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, भारतीय महिलेच्या मृत्यूनंतर खळबळ माजली असतानाच काही तासांनंतर पोर्तुगालच्या आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी राजीनामा दिला आहे.
एका ३४ वर्षीय गर्भवती भारतीय महिलेला सांता मारिया हॉस्पिटलमधून रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात नेले जात होते, त्याचदरम्यान महिलेला हृदयविकाराचा झटका आला. सांता मारिया हॉस्पिटलमध्ये नवजात शिशु काळजी सेवेसाठी खाटा उपलब्ध नसल्यामुळे त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यादरम्यान त्या महिलेचे निधन झाले. त्या महिलेच्या मृत्यूनंतर पोर्तुगालची आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांच्यावर टीका केली जात होती. टेमिडो यांच्यावर रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता, आपत्कालीन कार सेवा बंद करणे आणि गर्भवती महिलांसाठी योग्य आरोग्य सुविधांचा अभाव यामुळे तीव्र टीका होत होती. यानंतर पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांनी आरोग्यमंत्री डॉ. मार्टा टेमिडो यांचा राजीनामा घेतला.
हे ही वाचा:
सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट
बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की
मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात
इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग
भारतीय गर्भवती महिला ही पोर्तुगलमध्ये फिरण्यासाठी गेली होती. त्यादरम्यान महिला प्रसूतीसाठी देशातील सर्वात मोठ्या रुग्णालयात गेली. मात्र या रुग्णालयातील प्रसूती कक्षात तिला जागा मिळाली नाही. यामुळे, तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यात सांगण्यात आलं. महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेलं जात असताना, तिला ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर या महिलेचा मृत्यू झाला. महिलेने बाळाला जन्म दिला आहे.