नापसंतीच्या शिक्क्याला ट्रुडो स्वतःच कारणीभूत

सर्वेक्षणात पसंतीची मोहोर कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या नेत्याला

नापसंतीच्या शिक्क्याला ट्रुडो स्वतःच कारणीभूत

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविरुद्धच्या एका वक्तव्याने आज कॅनडालाच जागतिक टीकेच्या केंद्रस्थानी आणून ठेवले आहे. ट्रुडो यांची अपरिपक्व भूमिका आणि खलिस्तानी चळवळीच्या वर्चस्वाखाली असलेली हतबलता हेच दर्शवत आहे की, येत्या काळात ट्रुडो यांना कॅनडात मोठ्या नापसंतीला सामोरे जावे लागणार आहे.

 

याचे कारण म्हणजे कॅनडात नुकत्याच जाहीर झालेल्या इप्सोस सर्वेक्षणात आता निवडणुका झाल्या तर ट्रुडो यांना मोठा फटका बसेल अशी शक्यता व्यक्त करणअयात आली आहे. कॅनडातील नागरिकांपैकी ३१ टक्के लोकांना ट्रुडो यांनी पायउतार व्हावे असे वाटत आहे तर ४० टक्के लोकांना कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे पिएर पॉइलिरवे यांच्यावर भरवसा वाटत आहे. तर वादग्रस्त एनडीपी पक्षाचा जगमीत सिंग यांना मात्र अवघ्या २२ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे एकूणच जर आता निवडणुका कॅनडात झाल्या तर ट्रुडो यांचे काही खरे नाही.

 

अद्याप निवडणुकांना दोन वर्षे बाकी असली तरी ट्रुडो यांचे हे सरकार तसेही कुबड्यांवरच चालते आहे. या कुबड्या आहेत एनडीपी तथा न्यू डेमॉक्रेटिक पार्टीच्या. म्हणजे जगमित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या पक्षाच्या. जगमित सिंग हे खलिस्तानी चळवळीला पाठिंबा देणारे आहेत. या पक्षाने ट्रुडो यांना सत्तेवर येण्यासाठी आवश्यक असलेले पाठबळ दिले त्यामुळे आता त्यांच्या तालावर नाचण्याशिवाय ट्रुडो यांना पर्याय नाही. अर्थात, ट्रुडोही या खलिस्तानी चळवळीच्या नेत्यांना पाठीशी घालत आले आहेत. त्यातूनच त्यांनी हरदीप निज्जर याच्या हत्येबद्दल भारतालाच सवाल विचारला. कॅनडात स्थायिक होऊन दहशतवादी कृत्ये करणाऱ्या सरकार कसे काय समर्थन देऊ शकते हा मुख्य प्रश्न आहे. पण त्याचे सोयरसुतक ट्रुडो यांना नाही.

 

 

आपल्याला खुर्चीवर पकड कायम करायची असेल तर खलिस्तानी चळवळीला सांभाळून घेतले पाहिजे हीच त्यांची भूमिकार राहिलेली आहे. भारताचे विभाजन करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना, भारतातील युवकांना नशेच्या आहारी धाडणांच्या विरोधात भारत कायमच उभा राहणार आहे. मग त्यांना पाठिंबा देण्याऐवजी ट्रुडो मात्र भारतालाच शहाणपणा शिकवू लागले आहेत.

 

 

मध्यंतरी जी-२० परिषदेच्या निमित्ताने ते भारतात आलेले असताना आपल्याला केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सूट नाकारला होता तसेच त्यांचे विमान बिघडल्यानंतर सरकारने विमान देण्याची तयारी दर्शविल्यानंतरही ती ऑफर त्यांनी नाकारली. शेवटी ३६ तास आपल्या विमानाची दुरुस्ती होईपर्यंत ते ताटकळत राहिले आणि मग मायदेशी रवाना झाले. ट्रुडो यांची ही भारताबद्दलची दुस्वासाची भूमिका त्यांनाच खड्ड्यात नेणारी आहे.

 

भारताने कधीही कुणावर आक्रमण केलेले नाही किंवा दहशतवादाला पाठीशी घातलेले नाही. असे असताना ट्रुडो मात्र सरळसरळ दहशतवादाचे समर्थन करताना दिसतात. भारतातून बनावट पासपोर्टवर कॅनडात आलेल्या तिथे आसरा मिळतो, त्यांना तिथे नागरिकत्व दिले जाते आणि हीच मंडळी भारताविरोधात गरळ ओकतात तेव्हा मात्र ट्रुडो हे गप्प बसून राहतात. कॅनडात भारतविरोधी घोषणाबाजी होते, तिरंग्याचा अपमान होतो, भारतीय विशेषतः हिंदूंना आव्हान दिले जाते, पण ट्रुडो मात्र त्यावर चकार शब्द काढत नाहीत.

 

ही नाराजी केवळ भारताची नाही तर आज कॅनडातील जे अनिवासी भारतीय आहेत पण ते खलिस्तान चळवळीला पाठिंबा देत नाहीत, त्यांच्यात ट्रुडो यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. अमेरिकेतून पतवंतसिंग पन्नू हिंदूंना धमकावतो पण ट्रुडो त्यावर काहीही बोलत नाहीत. पण याच हिंदू समुदायाचे मनुष्यबळ ट्रुडो यांना हवे आहे, इतर धर्मियांचाही फायदा उठवायचा आहे पण त्यांच्या सुरक्षेविषयी किंवा त्यांना लक्ष्य करणाऱ्यांविरोधात ट्रुडो बोलायला तयार नाहीत.

 

हे ही वाचा:

आयुषमान भव : चार दिवसात ५ लाख लाभार्थी कार्ड !

अजित पवारांकडून शरद पवारांच्या आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी

दहशतवादी, गुन्हेगारांबद्दल केंद्र सरकारची टीव्ही वृत्तवाहिन्यांना सूचना

दहशतवादी, गुन्हेगारांबद्दल केंद्र सरकारची टीव्ही वृत्तवाहिन्यांना सूचना

कॅनडातील विविध भागात घेतलेल्या सर्वेक्षणात पॉइलिरवे यांनी ट्रुडो यांना पिछाडीवर टाकले आहे. हे सगळे आताच्या या राजकारणामुळे घडते आहे. भारताने त्याला चोख उत्तर देताना व्हिसा प्रक्रियाच थांबविली आहे. त्यामुळे कॅनडातील नागरिकांना भारतात येणे शक्य होणार नाही. भारतातील विद्यार्थ्यांनाही त्याचा फटका बसेल पण नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, हे खरे आहे. भारतात मात्र एक वर्ग आहे, ज्याला ट्रुडो यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे मनातल्या मनात गुदगुल्या होत आहेत.

 

 

जी-२० परिषदेत नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भारताला कसे यश मिळाले, कसे जगभरात भारताचे कौतुक झाले, यामुळे एक वर्ग निराश झाला होता. त्यांना ट्रुडो यांच्या या वक्तव्यामुळे आणि भारतविरोधी भूमिकेमुळे आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत. पण आता भारत बदललेला आहे. परदेशात राहून भारताला आव्हान देणाऱ्यांना चोख उत्तर भारत देईल आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनाही सडेतोड उत्तर देईल यात शंकाच नाही. पण आज भारतात नरेंद्र मोदी यांचे सरकार असल्यामुळेच ही सगळी खलिस्तानी पिलावळ जागी झाली आहे. त्यांना चीनचाही पडद्याआडून पाठिंबा आहे. त्यामुळेच ते फोफावले आहेत. ट्रुडो हे आता या खलिस्तानी पाठिंब्याची मजा घेत आहेत मात्र भविष्यात त्यांना ही चूक महागात पडू शकते. अर्थात, या संकटांना सामोरा जाण्यासाठी भारत समर्थ आहेच. ट्रुडो यांनी तूर्तास आपली खुर्ची वाचवावी आणि आपले भविष्यही.

Exit mobile version