बांगलादेशमध्ये हिंदुंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून या घटना थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच आता बांगलादेशमधील पोलिसांनीच हिंदूंना लक्ष्य केल्याची घटना घडली आहे. मंगळवार, ५ नोव्हेंबर रोजी बांगलादेशातील चितगाव शहरातील हजारी गोली येथे हिंदू समुदायावर पोलीस आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
उस्मान मोल्ला नावाच्या एका व्यापाऱ्याने इस्कॉन आणि सनातन धर्माविषयी अपमानास्पद टिप्पणी केली होती. या व्यापाऱ्याच्या विरोधात स्थानिक हिंदूंनी आंदोलन केले. हिंदूंनी उस्मानच्या दुकानाबाहेर जमून संताप व्यक्त केला. यावेळी उस्मान याच्यावर कारवाई करण्याऐवजी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी हिंदू जमावावर हल्ला केला आणि उस्मान याला सुरक्षित ठिकाणी नेले.
हे ही वाचा :
‘मुस्लिमांना कुंभमध्ये बंदी घातली तर हिंदूंना दर्ग्यात प्रवेश दिला जाणार नाही’
संविधान बचाव, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधींकडून अराजकता पसरवण्याचे काम सुरू
भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा
जम्मू- काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
याशिवाय व्यापाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी आरोप करत आहेत की, हिंदूंनी त्यांच्यावर विटा आणि ॲसिडने हल्ला केला. उलट लष्कर आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने हिंदू जमावावर लाठीहल्ला केल्याने किमान पाच हिंदू नागरिक जखमी झाले आहेत. शिवाय हिंदू समुदायातील अनेक सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चितगावमधील कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी सीसीटीव्ही नष्ट करत होते जेणेकरून त्यांनी हिंदू समुदायावर केलेल्या छळाचा कोणताही पुरावा पुढे सापडू नये. रात्री उशिरापर्यंत हिंदूंवरील हल्ले सुरूच होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.