पाकिस्तान लष्कराकडून पत्नीवर विषप्रयोग; इम्रान खान यांचा आरोप

न्यायालयात केला दावा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आल्यानंतर खान यांनी पाकिस्तानच्या लष्करावर एक गंभीर आरोप केला आहे. आपल्या पत्नीचं काही बरे वाईट झाल्यास याची जबाबदारी पाकिस्तान लष्कर प्रमुखांची असेल असा आरोप इम्रान खान यांनी म्हटलं आहे. तोशखान भ्रष्टाचार प्रकरणाच्या सुनावणीच्या दरम्यान न्यायाधीश नासिर जावेद यांच्यासमोर इम्रान खान यांनी हा दावा केला आहे.

पाकिस्तानच्या तेहरीक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांना तोशखान भ्रष्टाचार प्रकरणात आदियाला तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे. बुशरा बीबी यांना विष देण्यात आलं असून यामागे कुणाचा हात आहे ते मला माहीत आहे, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. इम्रान खान म्हणाले बुशरा बीबी यांच्या जीवाचे काही वाईट झाल्यास पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांना जबाबदार धरण्यात यावं, असं त्यांनी म्हटलं आहे.

एका गुप्तचर संस्थेचे सदस्य त्यांच्या इस्लामाबादमधील बनी गाला निवासस्थान आणि रावळपिंडी येथील अदियाला तुरुंगात सर्वकाही नियंत्रित करत होते. शौकत खानम रुग्णालयाचे डॉ. असीम यांना बुशराची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती इम्रान खान यांनी न्यायालयाला केली आहे. यापूर्वी तपासलेल्या डॉक्टरांवर माझा आणि पक्षाचा विश्वास नसल्याचेही ते म्‍हणाले.

हे ही वाचा.. 

बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण

पाठ्यपुस्तकातून बाबरीचा ‘ढाचा’ हटवून अयोध्येचे राममंदिर!

‘घरात घुसून मारू’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला थेट इशारा!

राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये मुस्लिम लीगच्या भीतीने काँग्रेसचेही झेंडे गायब?

यानंतर न्यायालयाने त्यांना पत्नी बुशराच्या वैद्यकीय तपासणीबाबत सविस्तर अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले. सुनावणीनंतर बोलताना बुशरा बीबी म्‍हणाल्‍या की, मी पाकिस्‍तानमधील अमेरिकन एजंट असल्याच्या अफवा पक्षात पसरत होत्या. माझ्‍या जेवणात टॉयलेट क्लिनर मिसळले जात होते. माझे डोळे सुजले आहेत, मला पोटात वेदना जाणवत आहे. अन्न आणि पाण्याची चव देखील कडू झाली आहे.

Exit mobile version