ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापू यांच्या रामकथेचा कार्यक्रम

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची राम कथेला हजेरी

‘मी आज येथे पंतप्रधान म्हणून नाही तर हिंदू म्हणून उपस्थित आहे,’ असे प्रतिपादन ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी केले. निमित्त होते केंब्रिज विद्यापीठ परिसरात आयोजित अध्यात्मिक उपदेशक मोरारी बापू यांच्या राम कथेचे.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापू यांच्या रामकथेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. ‘श्रद्धा ही अतिशय वैयक्तिक बाब आहे. ही श्रद्धा त्यांना जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये मार्गदर्शन करते,’ असे ऋषी सुनक यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी कार्यक्रमादरम्यान ‘जय सिया राम’ असे म्हणत नमस्कारही केला.

व्यासपीठाच्या पार्श्वभूमीवर दिसणार्‍या हनुमानाच्या चित्राचा संदर्भ देत ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले, ‘जसे बापूंच्या पार्श्वभूमीला सुवर्ण हनुमान आहे, तसाच मला अभिमान आहे की, १० डाऊनिंग स्ट्रीटवर माझ्या डेस्कवर सुवर्ण गणेश आनंदाने विराजमान आहे.” त्यांनी साऊथ हॅम्प्टनमध्ये त्यांनी व्यतित केलेल्या बालपणीच्या आठवणीही जागवल्या. ते आणि त्यांची भावंडे परिसरातील शेजारच्या मंदिरात जात असत, असे त्यांनी सांगितले. तसेच, आपण ब्रिटिश आणि हिंदू असल्याचा मला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

केंद्र सरकारने ठरवले टॉमेटो विकायचे ५० रुपये किलो दराने!

अजित पवारांसमोरच कार्यकर्त्यांकडून गोंधळ !

हरियाणातील नूह हिंसाचारप्रकरणी गोरक्षक बिट्टू बजरंगीला अटक !

सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारे कार्य करू!

‘बापू ज्या रामायणावर बोलले, तेच नव्हे तर भगवद्‌गीता आणि हनुमान चालिसा या पवित्र ग्रंथांना स्मरणात आठवून मी आज येथून निघतो आहे. माझ्यासाठी, जीवनातील आव्हानांना धैर्याने तोंड देण्यासाठी, नम्रतेने शासन करण्यासाठी आणि निःस्वार्थपणे कार्य करण्यासाठी प्रभू राम माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असतील,’ असे सुनक त्यांच्या समारोपाच्या भाषणात म्हणाले. ऋषी सुनक यांनी मंचावरील आरतीमध्येही भाग घेतला. मोरारी बापूंनी त्यांना ज्योतिर्लिंग रामकथा यात्रेतील पवित्र अर्पण म्हणून सोमनाथ मंदिरातील पवित्र शिवलिंग त्यांना भेट दिले.

Exit mobile version