भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचे निधन

वयाच्या १००व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचे निधन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचे शुक्रवारी निधन झाले. हिराबा या १०० वर्षांच्या होत्या. बुधवारी त्यांना अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर अहमदाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

अहमदाबाद येथील यूएन मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी अँड रिसर्च सेंटर येथे हिराबा यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. रुग्णालय व्यवस्थापनाने शुक्रवारी हिराबा यांच्या निधनाची माहिती दिली. पहाटे ३.३०च्या सुमारास त्यांचे निधन झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारीच अहमदाबाद येथे दाखल झाले होते. ते जातीने आपल्या आईच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवून होते. पण अखेर त्यांचे शुक्रवारी पहाटे प्राणोत्क्रमण झाले. हिराबा यांच्या पश्चात पाच मुलगे – सोमाभाई, अमृतभाई, नरेंद्रभाई, प्रल्हाद, पंकज आहेत. वासंतीबेन ही एक मुलगीही त्यांच्या पश्चात आहे.

मेहसाणा जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या आईचे निधन झाले होते. अत्यंत गरीबीत त्यांनी आपले आयुष्य कंठले. त्यामुळे त्यांना शिक्षणही घेता आले नाही. मात्र त्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या कुटुंबाला सावरले, मुलांना वाढविले.

हे ही वाचा:

निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे? स्था

यी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?

ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश

स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?

हिराबा या सध्या पंकज या त्यांच्या कनिष्ठ पुत्रासोबत राहात होत्या. पंतप्रधान त्यांच्या भेटीसाठी नियमित तिथे जात असत.

हिराबा यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोकसंदेश येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईच्या निधनानंतर ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. एक शानदार असे शतक इश्वरचरणी लीन झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आपल्या आईमध्ये आपण नेहमीच एक तपस्वी, निष्काम कर्मयोगी व जीवनमूल्यांच्या प्रती अढळ श्रद्धा अशा त्रिमूर्तीचा अनुभव घेतला, असेही पंतप्रधान यांनी लिहिले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनीही हिराबा यांना आदरांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ज्या संघर्षातून हिराबा यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले तो संघर्ष सर्वांसाठीच आदर्शवत आहे. त्यांचे त्यागपूर्ण, तपस्वीचे जीवन कायम आमच्या स्मरणात राहील. या वेळी संपूर्ण देश पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभा आहे.

Exit mobile version