27 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरदेश दुनियापंतप्रधानांचे पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकपासून बनलेले जॅकेट

पंतप्रधानांचे पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकपासून बनलेले जॅकेट

दिला पर्यावरणाचा संदेश

Google News Follow

Related

हवामान बदलाविरुद्धच्या लढ्याला लोक चळवळ बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी नेहमीच पुढाकार असतो. २०१९ साली महाबलीपूरमच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांना प्लॉगिंग करताना पहिले आहेच. आज पंतप्रधानांनी निळ्या रंगाचे जॅकेट घालून त्यावर हिरव्या रंगाचा एक संदेश लिहिला होता. त्यांनी संसदेत घातलेले निळे जॅकेट खास होते कारण ते रिसायकल केलेल्या पीईटी बाटल्यांपासून बनवले आहे.

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्ताव मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत पोचले. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने  बेंगळूर येथील इंडिया एनर्जी सप्ताहात पंतप्रधान मोदीना हे जॅकेट सादर केले.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन चे कर्मचारी आणि सशस्त्र दलांसाठी टिकाऊ कपडे बनवण्यासाठी दहा कोटींहून अधिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येईल. सरकारने अलीकडेच १९७०० कोटी रुपयांच्या खर्चांसह राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन देखील सुरु केले. जे कमी कार्बन तीव्रतेकडे अर्थव्यवस्थेचे संक्रमण आणखी सुलभ करेल आणि जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी पण करेल.

देशाला या क्षेत्रांत तंत्रज्ञान आणि बाजार नेतृत्व स्वीकारण्यास मदत करेल. याशिवाय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ऊर्जा संक्रमण आणि निव्वळ शून्य उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी ३५,००० कोटी रुपयांचा परिव्यय प्रदान करण्यात आला आहे. भारत सरकारच्या प्रमुख सात प्राधान्यांमध्ये हरित वाढ सूचिबद्ध करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली

जॅकेट कसे बनवले

तामिळनाडूतील करूर येथील श्री रेंगा पॉलिमर्स या कंपनीने पंतप्रधानांच्या या जॅकेटचे फॅब्रिक तैयार केले आहे. कंपनीने पी ई टी बाटल्यांपासून बनवलेले नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे इंडियन ऑइल कंपनीला पाठवले होते. यातून पंतप्रधान मोदींसाठी चंदनाच्या रंगाचे कापड निवडण्यात आले होते. त्यानंतर ते कापड मोदींच्या गुजरात मधील टेलरकडे पाठवण्यात आले होते. त्या टेलरने हे जॅकेट शिवून दिले. या जॅकेट साठी एकूण १५ बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. तर पूर्ण ड्रेस तैयार करायला सुमारे २८ बॉटल्स लागतात. याला रंग देण्यासाठी पाण्याचा वापर केला जात नाही. पहिल्यांदा फायबर तैयार केले जाते. त्या फायबरचे फॅब्रिकमध्ये रूपांतर करतात. आणि त्यानंतर शेवटी ड्रेस तयार करण्यात येतो. प्लास्टिकचा पुनर्वापर करून हे जॅकेट फक्त २,००० रुपयांमध्ये तयार होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा