पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत तिन्ही दलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्री कावेरिन सिंगही उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर,पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या डिजिटल पुस्तकात आपला संदेश लिहिला .
पंतप्रधान मोदी यांनी २५ फेब्रुवारी २०१९ रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले आणि ते राष्ट्राला समर्पित केले. हे स्मारक स्वातंत्र्यानंतर आपल्या शूर सैनिकांनी केलेल्या बलिदानाची साक्ष आहे. या स्मारकामध्ये एक चिरंतन ज्योत आहे. ही ज्योत जी कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या बलिदानाची साक्ष देते त्याचे उद्घाटन झाल्यापासून, राष्ट्रीय दिनानिमित्त श्रद्धांजली समारंभासह सर्व श्रद्धांजली समारंभ केवळ राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आयोजित केले जात आहेत. गेल्या वर्षी २१ जानेवारी रोजी इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती पूर्ण लष्करी सन्मानाने राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या चिरंतन ज्योतीमध्ये विलीन करण्यात आली होती.
हे ही वाचा:
बागेश्वर बाबांना नागपूर पोलिसांची क्लीन चीट
बंधुभाव आणला तर स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने होईल साकार
श्याम मानव आणि सपा नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी माफी मागावी
बॉक्सिंग फेडरेशनने निलंबित केलेले असतानाही जय कवळी ऑलिम्पिक संघटनेत कार्यरत कसे?
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांकडून अभिनंदन
भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले की, तुमचा देश आंतरराष्ट्रीय स्थैर्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. आम्ही आमच्या विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीला खूप महत्त्व देतो. पुतिन म्हणाले की, त्यांना खात्री आहे की दोन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आम्ही परस्पर फायदेशीर द्विपक्षीय सहकार्याचा अधिक विकास सुनिश्चित करू.