पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदींनी सांगितली दुसऱ्या एलिझाबेथ यांच्या भेटीची आठवण

ब्रिटनच्या राणी दुसऱ्या एलिझाबेथ यांचे बालमोराल येथे गुरुवार, ८ सप्टेंबर रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. एलिझाबेथ द्वितीय यांची तब्येत नाजूक असल्याचं याआधीच बकिंगहॅम पॅलेसकडून सांगण्यात आलं होतं. तसेच काल सकाळी त्यांची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी राजघराण्यातील सर्व स्कॉटलंडला जमले होते. एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत एलिझाबेथ यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. “महाराणी एलिझाबेथ दुसऱ्या या आमच्या काळातील दिग्गज म्हणून स्मरणात राहतील. त्यांनी आपल्या देशाला आणि लोकांना प्रेरणादायी नेतृत्व दिलं. सार्वजनिक जीवनात त्यांनी प्रतिष्ठा आणि सभ्यता दाखवली. त्यांच्या निधनाने दुःख झाले असून या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि ब्रिटनच्या जनतेच्या दुःखात सहभागी आहे,” असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

तर अजून एक ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी राणीसोबतच्या भेटीचे फोटो शेअर करत एक आठवण सांगितली आहे. “२०१५ आणि २०१८ मध्ये इंग्लंड दौऱ्यात राणी एलिझाबेथ दुसऱ्या यांच्यासोबत संस्मरणीय भेटी झाल्या. त्यांची कळकळ आणि दयाळूपणा कधीही विसरणार नाही. एका भेटी दरम्यान त्यांनी मला महात्मा गांधींनी त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिलेला रुमाल दाखवला होता,” अशी आठवण नरेंद्र मोदी यांनी सांगितली.

हे ही वाचा:

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांचे ९६व्या वर्षी निधन

याकुब मेमनची कबर का बनते आहे मजार?

पहिल्यांदाच ठाकरेंविरोधात कुणी ‘मैदाना’त उतरलंय!

‘बॉलीवूडच्या सिनेमातून भारतीयत्व हरवले आहे’

राणी एलिझाबेथ यांनी १९५२ मध्ये राज्यकारभार हाती घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर आता त्यांचे सुपुत्र प्रिन्स चार्ल्स हे देशाची सूत्रे राजा या नात्याने हाती घेणार आहेत. राजे चार्ल्स यांनी यासंदर्भात आपले निवेदन सादर केले असून त्यात ते म्हणतात की, माझ्या प्रिय आईच्या मृत्यूमुळे मला आणि आमच्या सर्व कुटुंबियांना अतिव दुःख झाले आहे. राणी एलिझाबेथ यांच्या मृत्युमुळे देशाचे नुकसान झाले आहे.

Exit mobile version