पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा

युक्रेन रशिया यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे भारतीय नागरिक विशेषतः विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित स्थलांतरासाठी रशियाकडून मानवतेच्या दृष्टिकोनातून सुरक्षित मार्ग तयार करत असल्याची माहिती भारतातील रशियन राजदूतांकडून देण्यात आली आहे. खार्कीव्हमधून या नागरिकांची सुटका करण्यासाठी रशिया या नागरिकांसाठी सुरक्षित मार्ग देणार आहे.

युक्रेन- रशियालगतच्या पूर्व आणि ईशान्य भागात सुमारे ४ हजार भारतीय अडकून पडले आहेत. विशेषतः वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताने रशिया आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर रशियातर्फे ही माहिती देण्यात आली आहे. याचसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे भारतातील रशियन दूतावासाने स्पष्ट केले आहे.

युक्रेनच्या खार्कीव्ह शहरात संघर्षादरम्यान २१ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याच्या झालेल्या मृत्यूची चौकशी रशिया करणार असल्याचे दूतावासाने स्पष्ट केले आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी दुसऱ्यांदा संवाद साधला. युक्रेनमधून भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याच्या मोहिमेबाबत पंतप्रधान मोदी यांनी पुतीन यांच्याशी चर्चा केली. पुतीन यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसंदर्भात पंतप्रधान मोदींशी सविस्तर चर्चा केल्याचे रशियन दूतावासाने ट्विटरवरुन म्हटले आहे.

हे ही वाचा:

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

आता बाजारात येणार पतंजलीचे क्रेडिट कार्ड

आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेचा थरार! भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध

ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित

याआधीही नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये २४ फेब्रुवारी रोजी चर्चा झाली होती. यावेळी पुतीन यांनी घडत असलेल्या घडामोडींबद्दल पंतप्रधान मोदींना सविस्तर माहिती दिली होती. तर पंतप्रधान मोदींनी, सर्व प्रश्न चर्चेतून सोडवावे असा सल्ला दिला होता.

Exit mobile version