पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान

फ्रान्सच्या राजदूत इमॅन्युअल लेनन यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी फ्रान्स दौऱ्यामुळे संरक्षण सहकार्य, व्यापार संबंध आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. फ्रान्समध्ये पंतप्रधान मोदी बॅस्टिल डे परेडमध्ये सन्माननीय अतिथी असतील. १४ जुलै हा बॅस्टिल डे (फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस) म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने होणाऱ्या परेडसाठी मोदी यांना आमंत्रित केले जात आहे.

 

फ्रान्स दरवर्षी प्रमुख पाहुणे म्हणून परदेशी मान्यवरांना आमंत्रित करत असल्याने हा एक दुर्मिळ सन्मान मानला जात आहे.
फ्रान्सच्या राजदूतांनी यावेळी दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यावर जोर दिला. त्याचा प्रत्यय या दिवसानिमित्त होणाऱ्या विशेष लष्करी परेडमध्ये येईल, असे ते म्हणाले.

 

‘परेडच्या सुरुवातीला भारतीय सैन्याचाही सहभाग असेल. तसेच, भारतीय राफेलच्या हवाई कसरतीही यावेळी होतील,’ अशी माहिती त्यांनी दिली. या भेटीमुळे मोठे संरक्षण करार, व्यापारात सहकार्य, द्विपक्षीय संबंधांसाठी एक नवीन मार्ग तयार होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. सन २०२२मध्ये हवाई दलाच्या विविध ३६ सामग्रींचा समावेश केल्यानंतर फ्रेंचांनी राफेल लढाऊ विमानांच्या नौदल आवृत्तीसाठी जोरदार बोली लावली आहे.

 

 

‘आम्ही सन १९५०पासून लढाऊ विमानांबाबत रताला सहकार्य करत आहोत. आम्ही भारताला सर्वोत्तम तंत्रज्ञान प्रदान करतो. एक जवळचा भागीदार आणि सहयोगी म्हणून आम्ही ‘मेक इन इंडिया’साठी जास्तीत जास्त योगदान देतो. त्यामुळे आम्ही एक चांगला प्रस्ताव दिला असून तो निर्णय आता खरोखरच भारतीय अधिकाऱ्यांच्या हातात आहे,’ असे राजदूत लेनन म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची पुडी

‘वंदे भारत’च्या चढ्या तिकीटदराचा पुन्हा घेणार आढावा

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाचा विळखा

पाकिस्तानातून पळून आलेली सीमा हैदर गुप्तहेर असल्याचा संशय

वृत्तानुसार, डसॉल्ट एव्हिएशनच्या राफेल-एम (सागरी) लढाऊ विमानांच्या खरेदीला भारत मंजुरी देऊ शकतो. ही विमाने भारताच्या नवीन अशा विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतवरून उड्डाण करतील. त्यांनी भारताला संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त परिषदेचे सदस्यत्व मिळवावे, यासाठी फ्रान्सचे समर्थन असल्याचे प्रतिपादन केले.

 

‘मेक इन इंडिया’बाबत फ्रान्स भारताला सहकार्य करत असल्याचे ते म्हणआले. आम्ही सह-विकासावर चर्चा करत आहोत. त्या हेतूने काही कंपन्या मल्टी-रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए)चा प्रस्ताव देत आहेत. भारताच्या स्वायत्ततेला चालना देण्यासाठी सह-विकास गरजेचा आहे,’ असे ते म्हणाले.

Exit mobile version