इटलीमध्ये जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत पार पडली चर्चा

इटलीमध्ये जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका

इटलीतील जी-७ (G-7) शिखर परिषदेनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इटलीत दाखल झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी काही देशांच्या प्रमुखांची भेट घेतली आहे तर काहींशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा देखील केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासह इतर जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या आहेत.

जी-७ शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी हे शुक्रवार, १४ जून रोजी सकाळी इटलीच्या अपुलिया येथे पोहोचले. भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर हा त्यांचा पहिलाच विदेश दौरा आहे. दरम्यान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ही बैठक अतिशय फलदायी झाली. युक्रेनसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारत उत्सुक आहे. चालू असलेल्या शत्रुत्वाबाबत, भारत मानवकेंद्रित दृष्टिकोनावर विश्वास ठेवतो. तसेच शांततेचा मार्ग आणि संवाद यावर विश्वास ठेवतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. यावर त्यांनी म्हटले आहे की, एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या माझ्या वचनबद्धतेचा मी पुनरुच्चार केला. सेमीकंडक्टर, तंत्रज्ञान आणि व्यापार यांसारख्या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक दृढ करण्यासाठी भरपूर वाव आहे. संरक्षण क्षेत्रातील संबंध अधिक दृढ करण्याबाबतही आम्ही बोललो.

पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे मॅक्रॉन यांनी संरक्षण, आण्विक, अंतराळ, शिक्षण, हवामान कृती, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, गंभीर तंत्रज्ञान, कनेक्टिव्हिटी आणि संस्कृती या क्षेत्रांसह भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा केली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी ‘मेक इन इंडिया’वर अधिक लक्ष केंद्रित करून धोरणात्मक संरक्षण सहकार्य अधिक घट्ट करण्यावर सहमती दर्शवली.

हे ही वाचा..

सराफा व्यापाऱ्याकडून शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या विरोधात फसवणूकीची तक्रार

अंतरवालीत जरांगेंनंतर ओबीसी आक्रमक, उपोषण सुरु!

“ठाकरेंनी चार महिने ज्यांचे पाय पकडले त्यांच्यामुळेच माविआला मतदान”

उजैनमध्ये सट्टेबाजांवर पोलिसांचा छापा, १४.५८ कोटी रुपये जप्त!

इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी आयोजित केलेल्या जी-७ च्या सहभागींव्यतिरिक्त अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांना आमंत्रित केले आहे.

Exit mobile version