पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर !

द्विपक्षीय संबंध, व्यापार, गुंतवणूक अशा विविध विषयांवर होणार चर्चा

पंतप्रधान मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर !

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई-सिंगापूर दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ३ ते ५ सप्टेंबर असा त्यांचा दौरा असणार आहे. पंतप्रधान मोदीं सुरवातीला ब्रुनेईला भेट देणार आहेत, त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी सिंगापूरला भेट देणार आहेत. या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणि सहकार्याच्या नव्या संधींवर चर्चा केली जाणार आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ब्रुनेई भेट असणार आहे. भारत आणि ब्रुनेई यांच्यातील राजनैतिक संबंध प्रस्थापित होऊन ४० वर्षे झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा होत आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सचिव जयदीप मजुमदार यांनी सांगितले की, ब्रुनेईचे सुलतान हाजी हसनल बोलकिया यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी ब्रुनेईला जात आहेत. ब्रुनेईच्या सुलतान यांनी यापूर्वी १९९२ आणि २००८ मध्ये भारताला द्विपक्षीय भेट दिली होती. यासोबतच २०१२ आणि २०१८ मध्ये एशियन देशांच्या परिषदेसाठी ब्रुनेयन राजनयिकांनी भारताला भेट दिली होती.

हे ही वाचा : 

पश्चिम बंगाल: विशेष अधिवेशनात मांडणार विधेयक; बलात्काराच्या दोषींना १० दिवसांत फाशी

मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी

राज्यातील प्रत्येक माणूस सुखी, समृद्ध, आनंदी होऊ दे

उद्धव ठाकरे यांना लोकांनीच गेट आउट केले

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, यावेळी ब्रुनेईशी संरक्षण, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध विषयांवर चर्चा केली जाईल. यासोबतच ऊर्जा, अवकाश, तंत्रज्ञान, आरोग्य, संस्कृती या क्षेत्रांवरही संयुक्त चर्चा होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे माजी परराष्ट्र सचिव जयदीप मजुमदार म्हणाले की, ब्रुनेईनंतर पंतप्रधान सिंगापूरला भेट देतील. पंतप्रधान मोदींचा सिंगापूर दौरा व्यापार आणि गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version