७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव राजस्थानी पगडी, कुर्ता आणि जॅकेट;
७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी परिधान केली होती . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज २६ जानेवारी७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २०२३ भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेली बहुरंगी राजस्थानी पगडी परिधान केली. प्रजासत्ताक दिनाच्या परेडपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी नॅशनल वॉर मेमोरियल येथे गेले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पगडीनं अनेकांचे लक्ष वेधले.
नरेंद्र मोदींचा खास पेहराव
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या खास पेहरावासाठी प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान . नरेंद्र मोदी अनेक वेळा विशिष्ट प्रदेशाचा पारंपारिक पोषाख परिधान करतात. यंदा ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नरेंद्र मोदी यांनी रंगी बेरंगी राजस्थानी पगडी, क्रिम कलरचा कुर्ता, काळे जॅकेट, पांढऱ्या रंगाचा स्टोल आणि काळे बूट असा पेहराव केला होता.
स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिननिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी खास पेहराव करतात. गेल्या वर्षी, प्रजासत्ताक दिनानिमित्त पीएमनी केलेल्या पोशाखात उत्तराखंड आणि मणिपूरच्या संस्कृतीची झलक दिसत होती. उत्तराखंडची ब्रह्मकमळ टोपी आणि मणिपूरचे लीरम फी स्टोल त्यांनी परिधान केले होती. मोदींच्या या पेहरावानं देखील आपलं लक्ष वेधल होतं. ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २०२१ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल रंगाची टोपी घातली होती. ही टोपी जामनगरच्या शाही राजघराण्यानं नरेंद्र मोदी यांना सप्रेम भेट म्हणून दिली होती. २०२० साली पीएम मोदींनी भगवी बंधेज टोपी परिधान केली होती.
हे ही वाचा:
मला तुरुंगात टाकण्याचे टार्गेट दिले होते, पण…फडणवीस काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे भागम भागचा तिसरा भाग
आपल्या देशात प्रत्येक धर्मात सण साजरे करण्याची परंपरा आहे. पण , काही सण असे असतात जे प्रत्येक देशवासीयांसाठी महत्त्वाचे आहेत. ते देशभर आदराने आणि आपुलकीने साजरे केले जातात. त्यातलाच एक राष्ट्रीय सण २६ जानेवारी हा देखील असाच एक सण आहे. देशातील प्रत्येक नागरिक मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा किंवा पंथाचा असो, हा दिवस संपूर्ण देशभक्तीने साजरा करतो.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. त्याआधी , २६ जानेवारी १९३० रोजी देशात प्रथमच पूर्ण स्वराज दिन किंवा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. पुढील १८ वर्षे या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.होता आज प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभर उत्साहाचं वातावरण बघायला मिळत असून तो उत्साह आपल्याला सगळीकडे पाहायला मिळत आहे.