इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत

अमेरिकेच्या बहुचर्चित आणि गाजलेल्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इजिप्तमध्ये दाखल झाले असून या दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधानांचे जंगी स्वागत करण्यात आले. २६ वर्षांत प्रथमच भारताचे पंतप्रधान इजिप्तला गेले आहेत. इजिप्तच्या काहिरा या राजधानीत पंतप्रधानांचे आगमन झाले. तिथे इजिप्तचे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी आले होते. पारंपरिक बँडच्या सहाय्याने हे स्वागत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमध्ये पोहोचल्यावर ट्विट केले की, भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध या दौऱ्यामुळे अधिक दृढ होतील, असा विश्वास आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांच्यासह चर्चा आणि अन्य कार्यक्रमांत सहभागी होण्यास उत्सुक आहे. पंतप्रधानांनी पुढे लिहिले आहे की, विमानतळावर माझे स्वागत करणाऱ्या पंतप्रधान मुस्तफा मदबौली यांचे धन्यवाद. भारत आणि इजिप्त यांच्यातील संबंध असेच वृद्धिंगत होवोत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा तेथील हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा अनिवासी भारतीयांनी मोदी मोदीच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत केले. वंदे मातरमचा जयघोषही केला. इजिप्तच्या एका महिलेने शोले या लोकप्रिय चित्रपटातील ये दोस्ती हम नही छोडेंगे हे गाणे गात पंतप्रधानांचे स्वागत केले. त्या महिलेचे ते गाणे पंतप्रधानांनीही ऐकले आणि हिंदी गाणे गात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. त्या महिलेने सांगितले की, तिला फार कमी हिंदी समजते आणि ती कधी भारतात आली नव्हती. तेव्हा मोदी त्या महिलेला म्हणाले की, तुम्ही भारतीय आहात अथवा नाहीत हे कळतही नाही.

हे ही वाचा:

सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केले १० कोटींचे हेरॉईन

मर्द पुन्हा महिलेवर बाह्या सरसावू लागले…

पंतप्रधान मोदींचा पराभव करण्यासाठी १५ पक्ष एकत्र येतात हाच त्यांच्या कर्तृत्वाचा विजय

सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार

 

रविवारी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष अल सिसी यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर त्यांची इजिप्तमधील विचारवंतांशी चर्चा होणार आहे. त्यानंतर अल हकीम मशिदीला ते भेट देणार आहेत. दाऊदी बोहरा समुदायाने ही मशीद उभारली आहे. १९७०च्या दशकापासून या समाजाने या मशिदीची देखभाल केली आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शहीद झालेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी हेलियोपोलिस कबरस्तानला भेट देतील. पहिल्या विश्वयुद्धात ३७९९ भारतीय सैनिकांनी प्राण अर्पण केले होते.

Exit mobile version