भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रविवारी इजिप्त दौऱ्यात ऑर्डर ऑफ नाइल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदी हे सध्या इजिप्तच्या दौऱ्यावर असून त्याआधी मोदींनी अमेरिकेच्या दौऱ्यात जगाचे लक्ष वेधून घेतले होते. इजिप्तच्या दौऱ्यातही मोदींचे जंगी स्वागत झाले. त्यानंतर तेथील राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल सिसी यांनी मोदींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविले. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांशी होणाऱ्या बैठकीआधी हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कारांची यादी प्रदीर्घ झाली आहे.
२०१४मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ ग्रहण केल्यापासून त्यांना मिळालेला हा १३वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची ही यादी
पापुआ न्यू गिनीने २०२३मध्ये मोदींना सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोघू या पुरस्काराने सन्मानित केले. पॅसिफिक बेटांच्या एकतेसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मान करण्यात आला.
हे ही वाचा:
अधिक काम करण्यासाठी ‘केदारनाथ’ यात्रेतील ”खेचरांना देतात गांजा” !
इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत
आगामी आंतरराष्ट्रीय आव्हानांसाठी आघाडीचे ३९ हॉकीपटू झाले सज्ज
इजिप्तच्या दौऱ्यात महिलेने ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’ गाणे गात केले मोदींचे स्वागत
कॅम्पॅनिअन ऑफ ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कारही २०२३मध्येच पंतप्रधानांना देण्यात आला. पंतप्रधान मोदींचे जागतिक नेतृत्व मान्य करून त्याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार देण्यात आला.
पापुआ न्यू गिनीला दिलेल्या भेटीत २०२३मध्ये एबाकल पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पलाऊ रिपब्लिकच्या राष्ट्राध्यक्षांनी हा पुरस्कार मोदींना प्रदान केला.
भुतानने डिसेंबर २०२१मध्ये ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो हा पुरस्कार देऊन मोदींचे कौतुक केले होते. हा भुतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
२०२०मध्ये सर्वोच्च सेवा आणि कामगिरीसाठी अमेरिकेच्या सेनादलामार्फत देण्यात येणारा लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार अमेरिकन सरकारने पंतप्रधान मोदींना दिला होता.
आखाती देशातील बहारिनने २०१९मध्ये किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसान्स हा पुरस्कार मोदींना प्रदान केला होता.
२०१९मध्येच मालदिवने आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधान मोदींना गौरवित केले होते. ऑर्डर ऑफ द डिस्टिन्ग्विश रुल ऑफ निशान इझुद्दीन असे या पुरस्काराचे नाव आहे.
त्याआधी म्हणजेच २०१८मध्ये पॅलेस्टिनने ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टिन हा पुरस्कार देऊन मोदींना सन्मानित केले होते.
अफगाणिस्तानने २०१६मध्ये मोदींना स्टेट ऑर्डर ऑफ गाझी आमिर अमानुल्ला खान या नावाने मोदींना पुरस्कार देऊन गौरविले होते.
२०१६मध्येच सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ अब्दुलअझीझ अल सौद हा सौदी अरेबियातील मुस्लिमेतर व्यक्तींना देण्यात येणारा पुरस्कार नरेंद्र मोदींना देऊन गौरवित केले होते.
त्याशिवाय, काही संस्था व संघटनांनीही पंतप्रधानांना सन्मानित केलेले आहे.
त्यात जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण पुरस्कार देऊन कॅम्ब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स सेरा यांनी मोदींना मान दिला होता. जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. २०२१मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता.
संयुक्त राष्ट्रांतर्फे देण्यात येणारा पर्यावरणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार चॅम्पियन्स ऑफ अर्थ ऍवॉर्डनेही मोदींना सन्मानित कऱण्यात आले होते.
जागतिक शांततेसाठी देण्यात येणारा सोल पीस प्राइझ हा पुरस्कार २०१८मध्ये मोदींना देऊन गौरविण्यात आले होते. दर दोन वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येतो.