रशिया-युक्रेन युद्धामुळे विभागलेल्या जगाला भारत एकत्र आणू इच्छितो!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला जी-२० परिषदेत संदेश

रशिया-युक्रेन युद्धामुळे विभागलेल्या जगाला भारत एकत्र आणू इच्छितो!

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे निर्माण झालेल्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेत संपूर्ण जगाला एकत्र आणण्याच्या मुद्द्यावर भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले की, या युद्धामुळे देशादेशांमध्ये जे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, ते दूर व्हायला हवे. देशांनी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि जी आव्हाने आपल्यासमोर आहेत त्यावर उपाययोजना शोधायला हव्यात.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० परिषदेचा प्रारंभ करताना म्हटले की, जर जग कोविड १९ला हरवू शकते तर एकमेकांमध्ये निर्माण झालेल्या अविश्वासाच्या वातावरणालाही समाप्त करू शकते. एक पृथ्वी या सत्रात संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, विश्वाच्या कल्याणासाठी आपण सगळ्यांनी एकत्र वाटचाल करण्याची वेळ आता आली आहे. या सत्रात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इनासियो लुला डासिल्व्हा उपस्थित होते.

 

हे ही वाचा:

शिक्षक आणि पालकांनी चारित्र्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी योगदान द्यावे

पोटनिवडणुकांत भाजपने दाखवली ताकद

ईरशाळवाडी दुर्घटनेत शोध न लागलेल्या ५७ व्यक्तींच्या नातेवाईकांना सानुग्रह अनुदान देणार

मोरोक्कोत विध्वंस, ३०० मृत्यू

भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या या सोहळ्यात पंतप्रधान म्हणाले की, मानवकेंद्रित दृष्टिकोनातून सगळ्यांना पावले टाकली पाहिजेत. संपूर्ण भारतच जी-२० बनला आहे. ६०पेक्षा अधिक शहरांत २०० पेक्षा अधिक कार्यक्रम जी-२०च्या माध्यमातून आयोजित करण्यात आले. आता आपल्याला वैश्विक अर्थव्यवस्थेतील चढउतार, उत्तर दक्षिण विभाजन, अन्नधान्यावरील निर्बंध, दहशतवाद, सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा, जलसुरक्षा अशा सगळ्या विषयांच्या बाबतीत असलेल्या आव्हानांना सामोरे जायला हवे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी एकत्रित पावले उचलली पाहिजेत.

 

 

मोदींनी सांगितले की, जी-२०मधील देश हे वैश्विक घरगुती उत्पादनांमध्ये ८५ टक्के, वैश्विक व्यापारा ७५ टक्के, विश्वातील जनसंख्येच्या बाबतीत दोन तृतियांश भागाचे प्रतिनिधित्व करतात. या समुहाला ग्लोबल साऊथची हाकही ऐकायला हवी.

Exit mobile version