पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युद्धग्रस्त युक्रेन दौऱ्यावर

नरेंद्र मोदी पोलंड देशाचाही करणार दौरा

पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युद्धग्रस्त युक्रेन दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच दोन देशांच्या विदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यात नरेंद्र मोदी यूक्रेनचा दौरा देखील करणार आहेत. नरेंद्र मोदींचा यावेळचा विदेश दौरा पोलंड आणि यूक्रेन या दोन देशांमध्ये असणार आहे. नरेंद्र मोदी पाहिले पोलंड आणि नंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युद्धग्रस्त युक्रेनचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे प्रथम पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथून ते युक्रेनला रवाना होतील. दरम्यान, नरेंद्र मोदी हे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाल्मिदीर झेलेन्स्की यांच्याबरोबर युद्धाबाबत चर्चा करतील. युक्रेनमधील संघर्ष थांबविण्यासाठी राजनैतिक प्रयत्न आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यात यावा, अशी भारताची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.

रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने दोन्ही देशांनी युद्धाचा मार्ग वापरण्याऐवजी सांमजस्याने आणि चर्चेने विषय सोडवावा अशी भूमिका घेतली होती. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचा दौरा केला होता. आता नरेंद्र मोदी पोलंड आणि यूक्रेनचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी २३ ऑगस्टला युक्रेन दौऱ्यावर जातील तर २१ आणि २२ ऑगस्टला ते पोलंड देशाचा दौरा करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यूक्रेन दौऱ्याकडे जगभरातील प्रमुख देशांचं लक्ष असेल. भारताचे पंतप्रधान ३० वर्षानंतर यूक्रेनच्या दौऱ्यावर जात आहेत. तर, ४५ वर्षानंतर भारतीय पंतप्रधान पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

हे ही वाचा:

सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न आता पूर्ण करायचेय!

जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये चकमक, सीआरपीएफचा अधिकारी हुतात्मा !

लाडक्या बहिणींचे आशीर्वाद फळणार का?

चांदीवलीत कट्टरपंथीकडून तीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार !

रशियाने फेब्रुवारी २०२२ मध्ये यूक्रेनवर आक्रमकण केलं होतं. यूक्रेनला नाटोचं सदस्यपद देण्यात येऊ नये यासाठी रशियानं आक्रमक भूमिका घेतली होती. नाटोचं सदस्यपद यूक्रेनला मिळाल्यास नाटोच्या सदस्य देशांचं सैन्य देखील रशिया यूक्रेन सीमेपर्यंत पोहोचू शकत, त्यामुळं रशियाचा यूक्रेनच्या नाटोच्या सदस्यपदाला विरोध आहे.

Exit mobile version